औरंगाबादसह मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी

काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सरी कोसळल्या
Marathwada weather update Heavy rainfall
Marathwada weather update Heavy rainfallsakal

औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह मराठवाड्याच्या काही भागांत बुधवारी पावसाने हजेरी लावली. काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सरी कोसळल्या. औरंगाबाद शहराच्या काही भागात सायंकाळनंतर पावसाला सुरवात झाली. चिकलठाणा वेधशाळेत १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील सोयगाव, वैजापूर, सिल्लोड, पैठण तालुक्यांतील काही गावांत पाऊस झाला. जालना शहरासह घनसावंगी, मंठा, अंबड, रोहिलागड, पिंपळगाव रेणुकाई, तीर्थपुरी, सुखापुरी परिसरात पावसाने हजेरी लावली.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरासह तालुक्‍यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जिंतूर तालुक्यात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह प्रथमच दीड तास जोरदार पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. धूळपेरणी केलेल्या क्षेत्राला या पावसाने दिलासा मिळाला.

हिंगोली शहर व परिसरात आज दुपारी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, जिल्ह्यात काही भागात शेतकऱ्यांनी हळद व कापूस लागवडीला सुरवात केली आहे.जालन्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

नांदेडमध्ये तासभर जोरदार सरी

नांदेड : गेल्या तीन दिवसांपासून नांदेड शहर आणि जिल्ह्यातील काही भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. आज दिवसभर उकाडा मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. रात्री साडेसातच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. नांदेड शहरातील अनेक भागात तासभर जोरदार पाऊस झाला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com