Aurangabad Measles Disease : गोवर संशयित आकडा शंभरीपार

रविवारी शहरात आढळली सहा संशयित बालके
Measles Disease
Measles Diseasesakal

औरंगाबाद : दिवसेंदिवस शहरात गोवरचा उद्रेक वाढतच चालला आहे. रविवारी (ता.४) शहरात गोवरच्या साथीचे आणखी सहा संशयित बालके आढळून आले आहेत. आतापर्यंत संशयित बालकांनी शंभरीचा आकडा पार केला असून १०५ इतकी संख्या झाली आहे. दरम्यान, उद्रेक झालेल्या भागात सोमवारी (ता.५) अतिरिक्त नऊ लसीकरण शिबिरे भरविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी सांगितले.

शहरात गोवराच्या साथीचा उद्रेक वाढत आहे. दररोज गोवर साथीचा रुग्ण आढळत आहे. चिकलठाणा, नेहरूनगर, बायजीपुरा, विजयनगर, गांधीनगर, नक्षत्रवाडी, नारेगाव मिसारवाडी, भीमनगर, सातारा, बन्सीलालनगर, भवानीनगर, जयभवानीनगर या भागात साथ पसरत चालल्याने संशयित व बाधित बालकांची संख्या वाढतच आहे. शनिवारपर्यंत संशयित बालकांची संख्या ९९ वर पोचली होती.

मागील दोन दिवसात एकाही बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. महापालिकेची आरोग्य यंत्रणा शहरात सर्वत्र सर्वेक्षण करत आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चौकशी करत आहेत. त्यातच रविवारी आणखी सहा संशयित बालके आढळून आले आहेत.

या बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे हाफकीन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. तसेच गोवर साथीला नियंत्रणात आणण्यासाठी उद्या सोमवारी चिकलठाणा, नेहरूनगर, विजयनगर, नक्षत्रवाडी या भागात प्रत्येकी दोन तर भवानीनगरात एक या प्रमाणे लसीकरण शिबिर घेतले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com