औरंगाबाद : महावितरणची शून्य थकबाकी मोहीम

थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करा
Aurangabad MSEB campaign Disrupt power supply to arrears
Aurangabad MSEB campaign Disrupt power supply to arrearssakal

औरंगाबाद : महावितरणला वीजटंचाईमुळे महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे विकलेल्या प्रत्येक युनिटचे पैसे वसूलीबरोवरत शुन्य थकबाकी मोहीम राबवा. अन्यथा थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करा, असे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.

वीज टंचाईतही महाराष्ट्रात महावितरण महागड्या दराने वीज खरेदी करून अखंडित वीज पुरवठा करत आहे. त्यामुळे महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील अभियंत्यांची व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे विशेष आढावा बैठक घेंण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीसाठी लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, नांदेडचे दत्तात्रय पडळकर, अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी डॉ. गोंदावले म्हणाले की, जनतेला भारनियमनाची झळ बसू नये यासाठी अनेक मार्गाने महागडया दराने वीज खरेदी केली जात आहे. अशा परिस्थितीत विकलेल्या विजेचे दरमहा पैसे वसूल होत नसल्याने थकबाकी वाढतच चालल्याने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच वीज पुरवठा खंडित करून थकबाकी वसूल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पन्नास हजार रूपये व त्यापेक्षा जास्त थकबाकी वसूलीसाठी विशेष कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्ती केले आहेत. थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केलेले का? हे पाहण्यासाठी क्रॉस चेकिंग अर्थात फेर तपासणीसाठीही विशेष पथकांचीही नियुक्ती केली आहे. थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांनी शेजाऱ्यांकडून वीज पुरवठा घेतल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com