औरंगाबाद : शंभर कोटींच्या रस्त्यांची निविदा उघडणार सोमवारी

स्मार्ट सिटी अभियानातून ३१७ कोटी रुपये खर्च
100 Crore Roads Tender
100 Crore Roads Tendersakal

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील रस्ते कामांची शंभर कोटींची निविदा काढली आहे. या निविदेचे टेक्निकल बीड सोमवारी उघडले जाणार आहे. शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांचे हाल झाले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानातून ३१७ कोटी रुपये खर्च करून १०७ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यासोबतच महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार २०० पैकी शंभर कोटी खर्चाच्या रस्ते कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात प्रत्येकी ५० कोटीचे दोन पॅकेज आहेत. एकूण ८१ रस्ते असून निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत २८ जून होती. त्यानंतर निविदांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सोमवारी टेक्निकल बीड उघडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीला कंत्राटदारांची दांडी

शंभर कोटींची रस्ते कामे करण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांची प्री-बीड बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीला एकही कंत्राटदार हजर नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com