औरंगाबाद : महापालिका आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी

आस्तिककुमार पांडेय आता सिडकोचे मुख्य प्रशासक
Aurangabad muncipal corporation
Aurangabad muncipal corporationsakal

औरंगाबाद : महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची राज्य शासनाने सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदली केली आहे. त्यांच्या जागेवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी हे पदभार घेणार आहेत. अवर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.

महापालिका आयुक्त म्हणून श्री. पांडेय यांनी नऊ डिसेंबर २०१९ ला पदभार घेतला होता. त्यानंतर चार महिन्यातच महापालिकेची मुदत संपल्यामुळे प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पदभार देण्यात आला. आपल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक कामे मार्गी लावली. महापालिकेला सुमारे पावणेतीनशे कोटी रुपयांचे देणे होते. ही बिले त्यांनी काढली. क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारला. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात सुमारे एक हजार कोटींच्या कामांच्या निविदा अंतिम केल्या. यातील काही कामे मार्गी लागली तर काही कामे पाइपलाईनमध्ये आहेत. कोरोना काळात त्यांनी नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले. कचरा कोंडीतून मुक्तता करताना तीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु केले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४० हजार घरे बांधण्याचा प्रकल्पाला त्यांनी मंजूरी मिळवून घेतली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्यासोबतच नागरिकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अडीच वर्षानंतर त्यांची सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची बदली करण्यात आली आहे.

डाॅ. चौधरी हे फेब्रुवारी २०१९ मध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाले होते. दोन महापूर, कोरोनासह संकटाच्या काळात जिल्हाधिकारी म्हणून डाॅ. चौधरी यांनी चांगले काम केले. प्रशासकीय शिस्त आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होती. सांगलीत येण्याआधी ते कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त होते.

दीपा मुधोळ यांची बदली

औरंगाबाद मुख्य प्रशासक (न्यु टाऊनशिप) सिडकोच्या दीपा मुधोळ-मुडे यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. या संदर्भात बुधवारी सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी एका पत्राद्वारे दीपा मुधोळ मुंडे यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. त्यांना तेथील जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडून पदभार घेण्यास सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com