औरंगाबाद : गुंठेवारीचे उत्पन्न गेले ९५ कोटींवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Corporation

औरंगाबाद : गुंठेवारीचे उत्पन्न गेले ९५ कोटींवर

औरंगाबाद : गुंठेवारी नियमितीकरणा अंतर्गत महापालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत तब्बल ९५ कोटी रुपये जमा झाले आहेत. गुंठेवारी नियमितीची प्रक्रिया ११ महिन्यांपासून सुरू असून आत्तापर्यंत सात हजार ७६६ फायली महापालिकेने मंजूर केल्या आहेत. शहरातील डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा केली. त्यानुसार महापालिकेने निवासी मालमत्तासांसाठी १५०० चौरस फुटापर्यंत रेडिरेकनर दराच्या ५० टक्के शुल्क तर व्यावसायिक

मालमत्तांसाठी संपूर्णपणे रेडिरेकनर दर आकारला जात आहे. सध्या सूट हळूहळू कमी केली जात आहे. महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत आत्तापर्यंत म्हणजेच अकरा महिन्यात सात हजार ७६६ फायली मंजूर केल्या आहेत. त्यातून सुमारे ९५ कोटीं १५ लाख ६७ हजार ९१८ रुपयांचा महसूल महापालिकेला मिळाला आहे.

गुंठेवारी कक्षाकडे एकूण नऊ हजार २८६ फायली प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ५०७ फायली नामंजूर करण्यात आल्या आहेत तर एक हजार १३ फायली विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. गुंठेवारीच्या सर्व फायली महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत, असे महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांनी सांगितले.

सातारा-देवळातून सर्वाधिक प्रतिसाद

सातारा-देवळाई भागातून सर्वाधिक तीन हजार ९७२ फायली दाखल झाल्या आहेत. त्यापैकी तीन हजार १९१ फायली मंजूर करण्यात आल्या आहेत. या भागातील २०८ फायली विविध कारणांमुळे नामंजूर करण्यात आल्या आहेत. अद्याप ५७३ फायली प्रलंबित आहेत. भागातून महापालिकेला ५४ कोटी ३३ लाख आठ हजार ७१८ रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.

Web Title: Aurangabad Municipal Corporation Gunthewari 7766 Files Approved In 11month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top