
औरंगाबाद : नाईक कॉलेजमधील मेळाव्यात ३ हजार ६७० जणांना रोजगार
औरंगाबाद : वसंतराव नाईक कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ८ हजार उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यापैकी ३ हजार ६७० जणांना नोकरी मिळाली तर, १६७० उमेदवारांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
वसंतराव नाईक महाविद्यालय आणि खासदार इम्तियाज जलील संचलित दुआ फाउंडेशन अंतर्गत जॉब अलर्टस् यांच्यातर्फे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी ४० औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्या, आस्थापनांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, खासदार इम्तियाज जलील, माजी खासदार उत्तमसिंह पवार, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, संस्थेचे सचिव नितीन राठोड, कोषाध्यक्ष डॉ. बिपीन राठोड यांची उपस्थिती होती.
रोजगार मेळाव्याला शनिवारी सकाळी दहा वाजता सुरु झाली. चार वाजेदरम्यान मुलाखती सुरु होत्या. औरंगाबाद जिल्हा व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील उमेदवारांनीही हजेरी लावली. यावेळी सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, प्रोग्रामर, इंजिनिअर, मशिन व सीएनसी ऑपरेटर, मार्केटिंग, सेल्स, मेडिकल लॅब टेक्निशियन, आयटीआय तंत्रज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, अकाउंटंट, फायनान्स, बँकर्स, टॅली कॉलर्स, कॉल सेंटर आदीसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
रोजगार व स्वयंरोजगारासाठी इच्छुक उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसमध्ये प्रवेश देऊन प्रशिक्षण, स्टेशनरी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे.
Web Title: Aurangabad Naik College Meeting 3670 People Employed Job Interviews
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..