५६ इंचाची छाती आता ११४ ची झाली : नाना पटोले

इंधन दरवाढीवरून नाना पटोले यांची पंतप्रधानांवर टीका
नाना पटोले
नाना पटोलेe sakal

औरंगाबाद : ‘माझी ५६ इंचाची छाती आहे’, असे म्हणून सत्तेवर आलेले आज देश विकत आहेत. देशाला बरबादीकडे नेणाऱ्यांची कसली ५६ इंचाची छाती? इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांचे खिसे रिकामे करण्याचे काम केंद्र शासन करत आहे. पेट्रोलचे दर ११४ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे यांची छाती आता ११४ ची झाली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता सोमवारी (ता. २५) केली.

प्रसिद्ध लोकगायिका व भीम गीत गायिका कडुबाई खरात यांना कॉंग्रेसतर्फे नाना पटोले यांच्या हस्ते सुंदरवाडी भागात सदनिकेची चावी देण्यात आली. भीमशक्ती संघटनेचे चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार सुभाष झांबड, नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, संजय राठोड, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, विष्णू शिंदे, भीमशक्ती संघटनेचे दिनकर ओंकार, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, वर्षा शिंदे, सारिका शिंदे, रामराव शेळके, संदिप बोरसे, सर्जेराव चव्हाण, भाऊसाहेब जगताप आदींची उपस्थिती होती.

नाना पटोले
महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप

कडूबाई खरात यांनी आंबेडकरी गीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांचे विचार घराघरांत पोचविण्याचे काम केले पण त्या बेघर होत्या. दोन महिन्यांपूर्वी जाहीर कार्यक्रमात त्यांनी खंत व्यक्त केली होती. त्यावेळी नाना पटोले यांनी घर देण्याचा शब्द दिला होता. अवघ्या दोनच महिन्यात हा शब्द खरा करून दाखविला, असे चंद्रकांत हंडोरे यांनी नमूद केले. कडूबाई यांच्या घर नसतानाच्या कटू आठवणी आता पाठीमागे पडल्या आहेत. त्यामुळे त्यांचे साखराबाई असे नामकरण करावे, असे आवाहनही केले. विष्णू शिंदे, दिनकर ओंकार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक किरण पाटील डोनगावकर यांनी केले तर आभार जगन्नाथ काळे यांनी केले.

घराचे स्वप्न अखेर पूर्ण

भिमगित गायिका कडूबाई खरात यांनी सदनिकेची किल्ली दिल्यानंतर त्या अत्यंत भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले, माझे घराचे स्वप्न सत्यात उतरले. नाना पटोले, चंद्रकांत हंडोरे यांनी मला हक्काचे घर दिले, असे कडूबाई म्हणाल्या.

इंधन दरवाढीच्या विरोधात जेलभरो

ता. १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले जाणार आहे. त्यात जुने व नवे दर नागरिकांच्या लक्षात आणून दिले जातील. त्यानंतरही इंधन दरवाढ मागे घेतली नाही, तर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री. पटोले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com