औरंगाबाद : कारच्या धडकेत रिक्षाचालक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Naregaon Three vehicles crush Rickshaw driver death in car accident

औरंगाबाद : कारच्या धडकेत रिक्षाचालक ठार

औरंगाबाद : भरधाव कारच्या धडकेत रिक्षाचालक ठार झाला. या अपघातात तीन वाहनांचा चुराडा झाला. हा अपघात नारेगाव कचरापट्टीजवळ रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडला.

हैदरशहा इब्राहीम शहा (वय ३०, रा. नारेगाव) हा रिक्षाचालक रविवारी सकाळी आठच्या सुमारास त्याचा रिक्षा (एमएच-२०-ई- ९१८३) यामध्ये गॅस भरण्यासाठी नारेगावकडून केंब्रिज शाळेकडे जात होता. त्यावेळी नारेगावजवळील कचरापट्टीजवळ हैदरच्या रिक्षाच्या पाठीमागून भरधाव वेगातील स्कार्पिओने जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षाचा चुराडा झाला. त्यानंतर स्कॉर्पिओ ही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर आदळली.

यामध्ये रिक्षाचालक हैदरशहा इब्राहिम शहा हा ठार झाला. या प्रकरणी मृत रिक्षाचालकाचा भाऊ उस्मान शहा इब्राहिम शहा यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओचालक शेख शफिक शेख रज्जाक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक श्री. घुगे हे तपास करत आहेत.

Web Title: Aurangabad Naregaon Three Vehicles Crush Rickshaw Driver Death In Car Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top