रक्तदान एक देशसेवा..! स्वातंत्र्यदिनी धर्मगुरूंकडून एकात्मतेचा संदेश   

dharmguru.jpg
dharmguru.jpg

औरंगाबाद :  स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (ता.१५) लोक विकास परिषदेने ध्वजवंदन करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदान शिबिर घेतले. यावेळी उपस्थित सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीने एकात्मतेचा संदेश दिला. देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी नागरिकांनी  जागरूक रहावे असा सूर यावेळी व्यक्त केला. ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकविकास परिषदेच्या वतीने शंभुनगर येथे हा कार्यक्रम उसाहात पार पडला. परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल वाहेद यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी महंत नारायणनंद सरस्वती हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पास्टर प्रवीण कुमार बोरगे, सरदार इक्बाल सिंग, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जेम्स आंबीलढगे, भन्ते रतनजी, इक्बाल अन्सारी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी  धर्मगुरूंनी उपस्थितांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. 

प्रास्ताविक सय्यद अब्दुल वाहेद यांनी केले. ते म्हणाले देश आज मोठ्या संकटातून जात आहे. कोरोना महामारी ने सर्व जनता त्रस्त झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. परंतु सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन लोक विकास परिषदेने रक्तदान शिबिराचा संकल्प केला होता. त्याला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन हाफिज मुस्ताक यांनी केले. 

रक्तदान शिबिरात सायंकाळपर्यंत दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. अमृता ब्लड बँकेचे डॉ. रामेश्वर जंगले, आकाश पाटील, सचिन वरपे, टेक्निशियन जयश्री शेंडगे, पूजा अंभोरे, आदींनी रक्त संकलनासाठी पुढाकार घेतला. यशस्वीतेसाठी परिषदेचे महासचिव हाफिज मुश्ताक, जावेद चाऊस, महेमूद पठाण, शेख मोहसीन, आमेर खान, नदीम खान, शेख हबीब, मोईनोद्दीन मोहंमद, सोहेल खान, एड सय्यद शरीफोद्दीन, नदीम खान, मोहंमद शफीक, अनवरखान, अमजद खान आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विविध जाती धर्मातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com