esakal | सिल्लोड तालुक्यात तरुण शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी आनंदा साळवे

सिल्लोड तालुक्यात तरुण शेतकऱ्याचा गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माणिकनगर (जि.औरंगाबाद) : येथून जवळच असलेल्या तलवाडा (ता.सिल्लोड) Sillod येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या Farmer केल्याची घटना रविवारी (ता.११) सकाळी उघडकीस आली. आनंदा भास्कर सावळे (वय ३५) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत वडोद बाजार पोलिसांनी Aurangabad सांगितले की, रविवारी सकाळी साडेदहा वाजता तरुणाने स्वतः च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का याचे कारण समजू शकले नाही. मृत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, एक बहिण, दो मुले असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संतोष डोंगरे हे करित आहेत.aurangabad news farmer committed suicide in sillod tahsil

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत रिमझिम सरी, मुसळधार पावसाची शक्यता

वडिलांचीही आत्महत्या

जवळपास ५ वर्षांपूर्वी आनंदा यांचे वडील भास्कर एकनाथ सावळे यांनी माणिकनगर येथील सिद्धेश्वर साखर कारखान्यात Siddheshwar Sugar Mill गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आता मुलानेही त्याच प्रकारे आत्महत्या करून जीवन सोपविल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

loading image