औरंगाबाद : बेशिस्त वाहतुकीवर सुचविले उपाय

पोलिस आयुक्तांसोबत विविध संघटनांची चर्चा : लोकसहभागाची अपेक्षा
Aurangabad Police Commissioner meeting Regarding traffic problems and solutions
Aurangabad Police Commissioner meeting Regarding traffic problems and solutionssakal

औरंगाबाद : शहरातील वाहतूक समस्या व उपाय यासंदर्भात शहरातील विविध संघटनांची पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याबरोबर विस्तृत चर्चा झाली.‌ आयुक्तांच्या कार्यालयात ही बैठक झाली.

जालना रस्ता, विविध चौक, धोकादायक जागा, अतिक्रमणे यांच्यावर उपलब्ध थेट सीसीटीव्ही प्रक्षेपण बघून सविस्तर चर्चा करण्यात आली.‌ संघटनांनी काही उपाययोजना प्रस्तावित केल्या. आयुक्तांनी अतिशय सकारात्मकपणे त्या समजून घेतल्या आणि ताबडतोब कार्यान्वित करता येतील अशा उपाययोजनांची नोंद करून घेतली. औरंगाबादचे नागरिक वाहतूक नियमांच्या पालनाच्या बाबतीत अत्यंत उदासीन असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली.

राँग साइड गाडी चालवणे, ट्रिपल सीट चालवणे यात सुशिक्षित नागरिकही सामील असतात. प्रत्येक नागरिक स्वतः जोपर्यंत वाहतूक नियमांच्या बाबतीत संवेदनशील होणार नाही तोपर्यंत प्रशासन अंमलबजावणीत तोकडे पडणारच. प्रत्येक वळणावर पोलिस कर्मचारी उभा करणे अशक्य आहे हे त्यांनी नमूद केले. जर ठरवले तर लोकसहभागातून आपले शहर वाहतूक शिस्त साध्य करू शकते, त्यासाठी स्वच्छतेसाठी गेली अनेक वर्षे अव्वल क्रमांकावर येणाऱ्या इंदूर शहरासारखे आदर्श आपल्या समोर आहेत. समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले.‌

जालना रस्त्यावरील आकाशवाणी व अमरप्रित चौक येथील दिवसभर लावण्यात येणाऱ्या वाहतूक अवरोधकांचे सर्वच संघटनांनी समर्थन केले व त्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाल्याचे नमूद केले.‌ बैठकीस सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, मासिआचे अध्यक्ष किरण पाटील, औरंगाबाद फर्स्टचे माजी अध्यक्ष प्रीतिश चटर्जी, कार्यकारी सचिव हेमंत लांडगे, सीआयआयचे प्रादेशिक संचालक अमोल मोहिते आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयंत जोशी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com