CoronaVirus : गरिबांची भूक भागवणाऱ्यांची पोलिसांकडून होतेय अडवणूक 

photo
photo

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात गरिबांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत. सर्व नियम पाळून, पोलिस परवानगी घेऊनच मदतीचे वाटप केले जात आहे; मात्र काही ठिकाणी पोलिस अडवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. असाच अनुभव आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विजय वाहूळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आला. विशेष म्हणजे, पोलिस अधिकाऱ्याने सुरवातीला त्यांच्या कामाचे कौतुक करीत नंतर त्यांना ऑनलाइन दंडाचा दणका दिला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून विजय वाहूळ यांनी गरजूंना धान्याच्या किट वाटण्यास सुरवात केली. ते गरजूंना धान्याची किट देण्यासाठी मंगळवारी (ता. १४) टीव्ही सेंटर येथून जात असताना टीव्ही सेंटरजवळ पोलिसांनी त्यांना थांबवले. गाडीची कागदपत्रे आणि अन्नधान्य वाटपाचा पोलिस परवाना त्यांनी दाखवला, तेव्हा तेथील महिला अधिकाऱ्याने तुम्ही खूप चांगले काम करत असल्याचे कौतुक करत सोडून दिले; मात्र त्याच महिला कर्मचाऱ्याने वाहूळ यांना सोडले नव्हते. कारण पुढच्या काही मिनिटामध्ये वाहूळ यांना ९०० रुपयांचा ऑनलाइन दंड आकारल्याचे लक्षात आले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार 

पोलिसांनी दंड केल्याचे लक्षात आल्यानंतर वाहूळ यांनी ट्विटरवर संताप व्यक्त करीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना टॅग करून तक्रार केली. एकीकडे शासनाच्या नाकर्तेपणामुळे गोगरिबांची उपासमार सुरू आहे. शासकीय लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते लोकांची भूक भागवत आहेत; मात्र त्यांना पोलिसाच्या हेकेखोर प्रवृत्तीचा सामना करावा लागत असल्याचे त्यात म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसाचे धोरण अडवणुकीचे 

मुळात परवानगी देतानाच पोलिसांकडून अडवणूक होते. किमान तीन-चार चकरा मारल्याशिवाय परवानगी दिली जात नाही. परवानगी देताना ठराविक भागासाठीच, ठराविक वाहनच वापरण्याचे बंधन घातले जाते. पोलिसांनी सिडको भागाची परवानगी दिली तर गारखेड्यातील भुकेल्या अथवा गरजू व्यक्तीला मदत देऊ नये, असे पोलिसांचे चुकीचे धोरण आहे. या विरोधात तक्रारी आणि जनक्षोभ वाढत असल्याने पोलिस आयुक्तांनीच मानवतेचा दृष्टिकोन ठेवून यंत्रणेला सूचना दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com