Aurangabad: मागे-पुढे पोलिसांचे वाहन अन् मधे शिवशाहीचा थाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivshahi

औरंगाबाद : मागे-पुढे पोलिसांचे वाहन अन् मधे शिवशाहीचा थाट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एरवी कुठले मंत्री किंवा व्हीआयपी आले की, मागे-पुढे पोलिसांचा ताफा असतो. हे दृश्‍य तसे नियमित दिसणारे. मात्र, आज एसटीच्या शिवशाहीच्या पुढे पोलिसांचे एक वाहन अन् मागेसुद्धा दुसरे वाहन, अशा वातावरणात प्रवाशांनी एसटीचा प्रवास केला. शहरातून पुण्याला जाताना आलेला हा अनुभव आमच्यासाठी अनोखा असल्याची भावना या प्रवाशांनी व्यक्त केली.

खासगी बसने प्रवास धोकादायक असतो, एसटीने प्रवास सुरक्षित आहे. शिवाय सध्या एसटीचा संप सुरू आहे. त्यामुळे पुण्याला कसे जावे, या चिंतेने प्रवाशांना ग्रासले होते. अखेर महामंडळाने तयारी केली अन् शिवशाही सोडण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद-पुणे शिवशाही बस पोलिस बंदोबस्तात सोडण्यात आली. यातून प्रवास करणारे अंभई (जि.औरंगाबाद) येथील किरण गव्हाणे यांनी शुक्रवारी (ता.१२) हा आगळावेगळा अनुभव ‘सकाळ’कडे कथन केला.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

श्री. गव्हाणे यांनी सांगितले, की शिवशाहीत २५ प्रवासी होते. वाळूजपर्यंत पोलिसांचा हा बंदोबस्त होता. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेची चालकावर जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे चालक दडपणात होते. यात नगरला १२ प्रवाशी उतरले, उर्वरित प्रवाशांनी घेऊन चालक पुण्याकडे गेले. संप सुरु असतानाही भीतीच्या वातावरणात हे चालक सेवा देत असल्याने आम्हाला सुरक्षित वाटले. ही बस इतर कोणत्याही बस्थानकावर थांबली नाही. सर्व सुरक्षितता बाळगत ही बस पुण्याला नेण्यात आली. बसमध्ये काही महिला प्रवाशीही होत्या.

loading image
go to top