Aurangabad : प्राध्यापकाच्या अपहरणप्रकरणी दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Aurangabad : प्राध्यापकाच्या अपहरणप्रकरणी दोघांना अटक

औरंगाबाद : आठवड्यापूर्वी झालेल्या भांडणानंतर पोलिसात तक्रार केल्याच्‍या कारणावरुन प्राध्‍यपकाचे अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी (ता. तेरा) आरोपींपैकी दोघांना अटक केली. त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी पी. एस. मुळे यांनी दिले.

विशाल डिडोरे आणि विजय ऊर्फ गंठु डिडोरे (दोघे रा. भानुदास नगर) अशी आरोपींची नावे आहेत. जखमी प्राध्‍यापक संदिप राधाकिसन पाथ्रीकर (रा. होनाजीनगर) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, ९ सप्‍टेंबर रोजी फिर्यादीची पत्‍नीला डिडोरे कुटूंबीयांनी मारहाण केल्याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्‍यात तक्रार केली होती.

तक्रारीमुळे त्यांना जीवे मारण्‍याची धमकीही आरोपींनी दिली होती. १२ सप्‍टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्‍यासुमारास फिर्यादी हे कॉलेजचे काम संपवून दुचाकीवर (क्रं. एमएच-२१-एसी-८४४०) घराकडे निघाले होते. त्यावेळी गोलवाडी टोलनाक्या समोर कारमधून आलेल्या चौघांपैकी विशाल आणि सागर यांनी फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर कारमध्‍ये टाकून त्‍यांचे अपहरण केल्याची तक्रार आहे. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपींना आज न्‍यायालयात हजर होते. न्यायालयात सहायक सराकरी वकील जनार्दन जाधव यांनी युक्तीवाद केला.