औरंगाबाद : रेल्वेचा एक स्‍टेशन एक उत्‍पादन उपक्रम

औरंगाबाद रेल्वेस्थानकावर पैठणी, हिमरू शालचे प्रदर्शन
railway station paithani himru Shawl exhibition
railway station paithani himru Shawl exhibition sakal

औरंगाबाद : रेल्वेस्थानकांना स्थानिक उत्पादनांसाठी विक्री आणि प्रचार केंद्र बनवण्याच्या उद्देशाने ‘एक स्टेशन एक उत्पादन’ हा उपक्रम दक्षिण मध्‍ये रेल्वेच्‍या प्रमुख स्‍थानकांवर सुरू करण्यात आला आहे. यात औरंगाबादसह सिकंदराबाद, काचिगुडा, विजयवाडा, गुंटूर या स्थानकांचा समावेश आहे. हा उपक्रम ९ एप्रिल ते ७ मे या ३० दिवसांच्‍या कालावधीत प्रत्‍येकी १५‍ दिवसांच्‍या दोन स्‍पेलमध्‍ये लागू केला जाणार आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर पैठणी साड्या आणि हिमरू शालचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये ‘एक स्टेशन एक उत्पादन’ संकल्पनेची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत, मोठ्या लोकसंख्‍येच्‍या रेल्वेस्‍थानकांवर स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची संकल्पना आहे. यामुळे स्थानिक कारागीर, कुंभार, विणकर, हातमाग विणकर आदिवासी आदींच्या उपजीविकेला चालना मिळणार आहे. यावेळी दक्षिण मध्‍य रेल्वेचे प्रभारी सरव्‍यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

या स्‍थानकांवर आहे उपक्रम

  • सिकंदराबाद ः हैदराबादी फ्रेशवॉटर पर्ल ज्वेलरी आणि हैदराबादी बांगड्या

  • काचिगुडा ः पोचमपल्ली हातमाग आणि कापड

  • विजयवाडा ः कोंडापल्ली खेळणी आणि हस्तकला

  • गुंटूर ः तेनाली हातमाग कापड आणि मंगलगिरी साड्या, ज्यूट आणि केळी फायबर उत्पादने

  • तिरुपती ः कलमकारी, हस्तकला आणि लाकडी कोरीवकाम

  • औरंगाबाद ः पैठणी साड्या आणि हिमरू शाल.

असे आहेत फायदे आणि संधी

  • प्रमुख स्थानकांवर त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करून राष्ट्रीय स्तरावर पोचण्याची संधी मिळेल.

  • ट्रेनच्या आगमनावेळी स्टेशनवर आणि प्लॅटफॉर्मवर स्वदेशी प्रचार आणि विक्री करण्याची सुविधा.

  • ५०० रुपयांच्‍या नोंदणी शुल्कावर १५ दिवस सुविधा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com