esakal | Aurangabad : प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : रक्ताने माखलेल्या कपड्यांचा शोध सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण
प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : रक्ताने माखलेल्या कपड्यांचा शोध सुरू

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : रक्ताने माखलेल्या कपड्यांचा शोध सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : प्रा. राजन शिंदे खून प्रकरणात तीन दिवसांनंतरही गुन्हे शाखेला खुनासंदर्भात अजूनही ‘क्लू’ मिळाला नाही. असे असले तरी तपास करणाऱ्या विशेष पथकाला मृत शिंदे यांच्या मुलाने चौकशीदरम्यान पित्याचा मृतदेह बघून आपण तिथेच गलितगात्र झालो होतो, असे सांगितले होते. पण मृताजवळचे रक्त पुसलेले दिसत होते, त्याबाबत पोलिसांनी विचारले असता, मुलाने ते पुसून घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. तेव्हापासून पथक रक्ताने माखलेल्या कपड्यांच्या शोधात असून यासाठी मृताचा मुलगा, मुलगी मात्र पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे.

प्रा. राजन शिंदे यांचा सोमवारी (ता.११) पहाटे एन-२ मधील संत तुकोबानगरात खून झाला होता. प्रा. शिंदे यांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाइकांची कसून चौकशी केली आहे. मात्र, यातूनही पोलिसांच्या पदरी निराशा पडल्याचे चित्र आहे. त्यादरम्यान पोलिसांनी मुलाची चौकशी करण्यास सुरवात केल्यापासून पोलिसांना तो ‘वेल प्लॅन्ड’ उत्तरे देत आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ रक्त पुसलेल्या खुणा दिसल्याने पोलिसांनी शिंदे कुटुंबीयांना विचारले असता, मुलाने आपण कपड्याने पुसून घेतल्याचे सांगितले खरे, मात्र पुसून घेऊन कपडे कुठे फेकले, याबाबत तो पोलिसांना काहीही उत्तर देत नाही.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

प्रा. शिंदे यांचा खून झाल्यापासून पोलिसांच्या पथकाने शिंदे कुटुंबीयांची चौकशी करण्यास सुरवात केली खरी, मात्र पोलिसांना सहकार्य करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. खुनाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या कुटुंबातील सदस्यांची तब्बल १० तास चौकशी केली, मात्र प्रत्येक सदस्याचे तफावत असणारे मत समोर येत होते. खून झाल्याच्या तीन दिवसांनंतरही पोलिसांना काहीच माहिती न देणाऱ्या शिंदे कुटुंबीयांना तपासाबाबत स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाले असून पोलिस अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. १२) पत्नी मनिषा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जात कुलगुरू, कुलसचिवांची भेट घेतली. यावेळी विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातून विद्यापीठात बदली करण्याची विनंती त्यांनी केली.

loading image
go to top