औरंगाबाद : शहागंजमध्ये घड्याळाची टिकटिक सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Shahaganj area historical tower clock started

औरंगाबाद : शहागंजमध्ये घड्याळाची टिकटिक सुरू

औरंगाबाद : शहागंज भागातील ऐतिहासिक टॉवरचे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले आहे. याठिकाणी असलेले जुने घड्याळ दुरुस्त करण्याचा देखील प्रयत्न झाला पण कारागीर मिळत नसल्याने नवेच घड्याळ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नव्या इलेक्ट्रीक घड्याळाची टीकटीक सुरू झाली आहे. या घडाळ्याचा गजरही नागरिकांना ऐकायला मिळणार आहे.

शहागंज चमन भागात शेवटचा निजाम मिर उस्मान अली खान याने १९३० मध्ये ऐतिहासिक टॉवरमध्ये भले मोठे घड्याळ लावले होते. या घडाळ्याचा वापर रमजान काळात लोकांना सहर आणि इफ्तार सोडण्याच्या वेळा समजाव्यात यासाठी केला जात होता. जुन्या पद्धतीच्या या घडाळ्याला चावी द्यावी लागत होती. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे टॉवरसह या घडाळ्याची दुरवस्था झाली. काही संस्थांनी पुढाकार घेत घड्याळाची दुरुस्ती करण्याची तयारी केली. पण त्यात यश आले नाही. दरम्यान स्मार्ट सिटी अभिनामार्फत टॉवरचे सुशोभीकरण व घडाळ्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला.

टॉवरचे सुशोभीकरण पूर्ण झाले आहे. जुने घड्याळ दुरुस्त करण्यासाठी एजन्सीचा शोध घेण्यात आला. पण कारागीर सापडला नाही. त्यामुळे या टॉवरवर नवीन इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे घड्याळ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे घड्याळ जुन्या घड्याळासारखेच असून, त्यात अलार्म वाजण्याचीही सुविधा असणार आहे.

गुरुवारपासून या घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे. नागरिकांना पूर्वीप्रमाणे गजरही ऐकायला मिळणार आहे, असे स्मार्ट सिटीच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले.

Web Title: Aurangabad Shahaganj Area Historical Tower Clock Started Under Smart City Mission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top