Aurangabad : स्मार्ट सिटीतील रस्त्यांसाठी निधीची पडताळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Smart City Roads

Aurangabad : स्मार्ट सिटीतील रस्त्यांसाठी निधीची पडताळणी

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यात २२ रस्त्यांची कामे केली जात असली तरी उर्वरित कामे रद्द करण्यात आलेली नाहीत तर स्थगिती जुन्याच प्रशासकांच्या काळात देण्यात आली आहे. उर्वरित कामे करण्यासाठी स्मार्ट सिटीला निधी प्राप्त होईल का?, महापालिकेमार्फत निधी देता येईल का? महापालिकेची निधी देण्याची आर्थिक परिस्थिती आहे का? या तीन पर्यायांची पडताळणी केली जाईल, असे महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी सांगितले.

स्मार्ट सिटीतून ३१७ कोटी रुपये खर्चून १०८ रस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामांची निविदा ए. जी. कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे तर कामांवर देखरेख करण्यासाठी मुंबई आयआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीमार्फत १०८ रस्त्यांची अंतर्गत कामे हाती घेण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. असे असतानाच १०८ पैकी तब्बल ८६ रस्ते कामांना स्थगिती देण्यात आली. याविषयी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीला एक हजार कोटींचा निधी आहे.

पण त्यापेक्षा जास्तीचे कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे तत्कालीन सीईओ यांनीच केवळ २२ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात घेण्यासाठी कंत्राटदाराला पत्र दिलेले आहे. उर्वरित ८६ रस्त्यांची कामे रद्द केलेली नाहीत तर स्थगित ठेवले आहेत. ही कामे करण्यासाठी स्मार्ट सिटीतून निधी उपलब्ध होईल का किंवा महापालिकेतून त्यासाठी निधी वर्ग करता येईल याची चाचपणी सुरू आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

हे आहेत पहिल्या टप्प्यातील अंतिम २२ रस्ते

 • देवगिरी बँक जळगाव रोड ते बजरंग चौक एन- ५ सिडको

 • ओंकार गॅस एजन्सी एन- ८ सिडको मार्गे वेणूताई चव्हाण स्कूल ते अनिकेत हॉस्पिटल सिडको

 • आविष्कार चौक ते भोला पान सेंटर सिडको

 • तापडिया पार्क ते पब्लिक स्कूल ते पुंडलिकनगर पोलिस स्टेशन आणि मनपा उद्यान पारिजातनगर

 • रिलायन्स पेट्रोल पंप जळगाव रोड ते त्रिदेवता मंदिर मार्गे एन ७ पोलिस स्टेशन

 • डॉ. कल्याण काळे यांचे घर ते लोकसेवा स्टेशनरी ते परिवर्तन गॅरेज, मथुरा नगर सिडको एन-६

 • छत्रपती कॉलेज ते उच्च न्यायालय पूर्व पश्चिम बाजू मार्गे प्रवीण मंडलिक यांचे घर

 • प्रतानगर स्मशानभूमी ते उड्डाणपूल दोन पुलांसह स्मशानभूमीजवळ आणि देवानगरी अंतर्गत रस्ता

 • जवाहर कॉलनी पोलिस स्टेशन ते सावरकर चौक गारखेडा

 • आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर

 • एकता चौक शहानूरमिया दर्गा ते प्रतापनगर ऑटोरिक्षा स्टॅण्ड पंजाब डेअरी

 • एमटीडीसी हॉलीडे कॅम्प ते अण्णाभाऊ साठे चौक मार्गे मिलिंदनगर, कबीरनगर

 • न्यू. भाग्योदयनगर उमरीकर लॉन ते लोटस पार्क सातारा परिसर

 • पडेगाव ते पडेगाव स्लॉटर हाऊस

 • बाटा शूज ते एसबी कॉलेज गेट आणि गोली वडापाव ते एसबी कॉलेज गेट

 • जिंतूरकर हॉस्पिटल ते अदालत रोड आणि भाग्यनगरातील अंतर्गत रस्ता

 • माऊली मेडिकल स्टेअर ते भावसिंगपुरा सांची कमान

 • एसबीओ स्कूल ते अंबिकानगर, तुळजाभवानी चौक ते भगतसिंगनगर

 • सौभाग्य चौक ते ताठे मंगल कार्यालय ते सिद्धार्थ चौक

 • आंबेडकर पुतळा भगतसिंगनगर ते पिसादेवी रोड

 • दर्गा हजरत पीर साहेबपुतळा ते रेंगटीपुरा मार्गे चंपा चौक

 • गणपती मंदिर नागेश्वरवाडी ते एमजेपी कार्यालय आणि खनाळे हॉस्पिटल ते झांशीराणी चौक

Web Title: Aurangabad Smart City Roads Development Fund Construction Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..