औरंगाबाद : पाणीपुरवठ्यासाठी वॉर रूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad smart city water scarcity installing booster Dhorkin Pump House

औरंगाबाद : पाणीपुरवठ्यासाठी वॉर रूम

औरंगाबाद : शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता १० सूत्री कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉररूम तयार करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागासाठी पालक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नऊ पथक नेमण्यात आले आहेत. आठ निवृत्त अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली.

पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, पाणीपुरवठा विभागासाठी तीनऐवजी चार उपअभियंता देण्यात आले आहेत. ढोरकिन पंप हाऊस येथे बूस्टर बसवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. नऊ प्रभागासाठी नऊ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्त संतोष टेंगळे व कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर संपूर्ण पाणी पुरवठ्याची जबाबदारी असेल.

कार्यकारी अभियंता किरण धांडे व कंत्राटी पद्धतीने घेतलेले अधिकारी जायकवाडीपासून शहरापर्यंतच्या पाणी वितरण व्यवस्थेवर लक्ष देतील. पाणी गळती बंद करण्यासाठी उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. हर्सूल येथील इनलेट लाइनची तपासणी करून अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. टॅंकरच्या पाण्यासाठी एमआयडीसीकडून मिळणाऱ्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे सिडको एन-५ येथील टाकीच्या पाण्यात पाच एमएलडी एवढी बचत होत आहे.

एसटीपीच्या पाण्याचा वापर

बांधकामासाठी मलजल प्रक्रिया केंद्रातून पाणी पुरवठा करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी अफसर सिद्दिकी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच विहीरी अधिग्रहीत करण्यासाठी पत्र पाठविले जाणार आहे. जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजयसिंग व शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाजीनगर, सूतगिरणी, पुंडलिक नगर, जुबली पार्क व वेदांत नगर येथे टाक्यावर नागरिक मित्र पथकाचे माजी सैनिक पाणीपुरवठाच्या दिवशी उभे राहतील, असे पांडेय यांनी सांगितले.

२४ बाय ७ वॉर रूम

स्मार्ट सिटीच्या कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आली आहे. वॉररूमधून वेळापत्रकाची अंमलबजावणी, पाण्याच्या टाकी वर सीसीटीव्ही निगराणी व तक्रार निवारणासाठी आईव्हींआर हेल्पलाईन चालवल्या जातील. फैज अली वॉररूम काम पाहतील. आत्तापर्यंत २० टँकरला व्हिटीएस लावण्यात आले आहेत. प्रत्येक टँकर पाँईटवरील जुने सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्यात आलेले आहेत. टँकरला आरएफआयडी-बारकोड देऊन येण्या-जाण्याच्या वेळा नोंदविण्याचे काम स्मार्ट सिटी मार्फत सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Aurangabad Smart City Water Scarcity Installing Booster Dhorkin Pump House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top