औरंगाबादेतून सोनोग्राफी मशीन जप्त

बीडमधील गर्भपात, गर्भलिंगनिदान प्रकरण, सहाही आरोपी कोठडीत
Aurangabad Sonography machine seized
Aurangabad Sonography machine seizedsakal

बीड : अवैध गर्भपातानंतर सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) हिच्या मृत्यूनंतर दाखल गर्भलिंगनिदान, गर्भपात प्रकरणातील सहाही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. अटक केलेल्या सतीश बाळू सोनवणे या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्याकडून गर्भलिंगनिदानासाठी वापरलेले सोनोग्राफी मशीन पोलिसांनी जप्त केली आहे. या मशीनचे जालना कनेक्शन असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

तीन मुली असलेल्या सीताबाई यांचा पाच जूनला मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीत १८ आठवड्यांचा गर्भपात, गर्भाशयाला इजा झाल्याने अतिरक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. फौजदार ढाकणे यांच्या फिर्यादीवरून महिलाचा पती गणेश सुंददराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (रा. बक्करवाडी, ता. बीड), महिलेचा भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), त्यावेळी बडतर्फ अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनग बीड) यांच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मनीषा सानप हिच्या घराच्या झडतीमध्ये २९ लाख रुपये, गर्भपाताची औषधे, गर्भपाताची उपकरणे व सोनोग्राफीसाठीचे अन्य साहित्य आढळले.

चौकशीत मनीषा सानप हिच्या घरी येऊन सतीश बाळू सोनवणे (रा. जाधववाडी, ता. जि. औरंगाबाद) हा वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी गर्भलिंगनिदान करत असल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी अटक केली. तो चार महिन्यांपासून मनीषा सानपच्या घरी येऊन पोर्टेबल मनीशच्या साहाय्याने गर्भलिंगान करत असल्याचे समोर आले. सीताबाई गाडे हिचे गर्भलिंगनिदानही त्यानेच केले होते. त्याने वापरलेली मशीन पोलिसांनी औरंगाबादेतून जप्त केले. सहाही आरोपी पोलिस कोठडीत आहेत.

जालना कनेक्शनचा संशय

जालना येथेही एका डॉक्टरला गर्भलिंगनिदान प्रकरणात नुकतीच अटक झाली आहे. बीडच्या प्रकरणात अटक झालेला सतीश सोनवणे जालन्यातील या डॉक्टरकडे सहायक म्हणून काम करत होता. या घटनेत वापरलेले किंवा त्यापूर्वी त्याने वापरलेली पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जालना येथील डॉक्टरचे असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

आरोग्य विभागाकडूनही स्वतंत्र तयारी

पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यानुसार स्वतंत्र फिर्याद देण्यासाठी आरोग्य विभागाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. या प्रकरणात दोन्ही कायद्यांचे उल्लंघन झाल्याने वकिलांच्या सल्ल्याने न्यायालयात स्वतंत्र फिर्याद दिली जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com