औरंगाबाद : मंदिरांवर लावले भोंगे

मनसेतर्फे हनुमान चालिसाच्या ३००० पुस्तकांचे वाटप
MNS distribute 3000 book Hanuman Chalisa
MNS distribute 3000 book Hanuman Chalisa sakal

औरंगाबाद : हनुमान जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अखेर औरंगपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदीरावर भोंगे लावले. त्यानंतर शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी मनसेतर्फे शुक्रवारी रात्रीच भोंगे लावण्यात आले होते. शनिवारी सकाळी मनसे पदाधिकारी आणि मनसैनिक भगव्या टोप्या आणि उपरण्यांसह मंदीर परिसरात आले. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर मंदिरातील गुरुजींसोबत मनसैनिकांनी रस्त्यावर बसत हनुमान चालिसाचे पठण केले.

यानंतर मनसेतर्फे तीन हजार हनुमान चालिका पुस्तकाचे वाटप करण्यात आले. ही पुस्तके भाविकांनी मंदिरात दर्शन घेऊन जात असताना मोफत वाटण्यात आली. मनसेच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी भाजपचे आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकारी आले, यावेळी त्यांनाही हनुमान चालिसा भेट दिली यावेळी घोषणाबाजी झाली.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, वैभव मिटकर, महानगरप्रमुख बिपीन नाईक, शहराध्यक्ष आशिष सुरडकर, गजन गौडा पाटील, प्रशांत दहिवाडकर, अनिकेत निल्लावार, राजीव जावळीकर, संकेत शेटे, राहुल पाटील, मंगेश साळवे, लीला राजपुत, अनिता लोमटे, रीना राठोड, सपना ढगे, अभय देशपांडे, मनिष जोगदंड, शेखर पाटील, गणेश साळुंके, निखील मालू, निखील ताकवले, किरण जोगदंड, शिवाजी वीर, शेखर रणखांब पाटील, अमित ठाकूर, अभय माजरमकर, मोनू तुसे, आकाश खोतकर, विक्की जाधव, दीपक कुमावत, मोनू सेठी, शिवाजी करवंदे, चिन्मय कुलकर्णी, अमित दायमा, राहुल रगडे, विशाल भालेराव, विक्रम परदेशी, चंदू नवपुते, प्रशांत जोशी, अमीत ठाकूर, प्रल्हाद लहिरे, सारंग पवार आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com