Aurangabad : आजपासून जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा महाकुंभ

वेळापत्रक जाहीर; सर्वप्रथम अवघड क्षेत्रांची निश्चिती, ५ जानेवारीला बदलीपात्र शिक्षकांच्या हाती पडणार आदेश
Teacher transfers
Teacher transferssakal

औरंगाबाद : जिल्ह्यांतर्गत ऑनलाइन बदलीचा हा महाकुंभ सोमवारपासून (ता.३१) सुरू होऊन सर्वच संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी ५ जानेवारीला निर्गमित होऊनच संपणार आहे. म्हणजेच तब्बल २ महिने बदल्यांचे जागरण गोंधळ चालणार आहे.

राज्य सरकारने या बदल्यांसाठीचे सविस्तर वेळापत्रक जिल्हा परिषदेला निश्‍चित केले आहे. कोरोनामुळे ३ वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या.

राज्य सरकारने गेल्या वर्षी शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द करून नवे बदली धोरण जाहीर केले होते. नव्या धोरणानुसार ऑनलाइन बदल्या करण्यासाठी खास मोबाईल अॅप विकसित केले आहे. यानुसार याप्रक्रियेत यंदा औरंगाबाद जिल्ह्यातून अंदाजे १ हजार शिक्षकांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या होतील.

याप्रमाणे सर्वच जिल्ह्यांचा विचार केल्यास राज्यभरातील सुमारे ३० हजार शिक्षकांच्या बदल्या होण्याच्या प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यांतर्गत बदली करताना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत ५ वर्षे पूर्ण झाली आहे, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे.

अवघड क्षेत्र आणि शाळांची यादी घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यासंदर्भात प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील ३० शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. पक्षाघाताने आजारी, दिव्यांग, शस्त्रक्रिया, विधवा, कुमारिका, परित्यक्ता-घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच व्याधिग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रीकरण आदी या विशेष संवर्ग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे.

असे असेल बदल्यांचे वेळापत्रक

  • अवघड क्षेत्रातील शाळा, बदलीपात्र आणि अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी जाहीर - ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर.

  • रिक्त पदांची यादी अद्ययावतीकरण : ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर.

  • विशेष संवर्ग भाग १, २ चे फॉर्म भरणे- ५ ते ७ नोव्हेंबर.

  • बदलीपात्र, बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी पुन्हा जाहीर करणे, विशेष संवर्ग भाग १ व २ यांच्या याद्या प्रसिद्ध ९ नोव्हेंबर.

  • शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील - १० ते १२ नोव्हेंबर.

  • मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपील - १७ ते १८ नोव्हेंबर.

  • बदलीपात्र आणि बदली अधिकारप्राप्त, विशेष संवर्ग भाग १ व २ यांच्या याद्या पुन्हा प्रसिद्ध - २२ नोव्हेंबर.

  • रिक्त जागांची यादी जाहीर - २३ नोव्हेंबर.

  • विशेष संवर्ग भाग १ साठी प्राधान्यक्रम भरणे - २४ ते २६ नोव्हेंबर.

  • विशेष संवर्ग भाग १ साठी बदली प्रक्रिया

  • चालवणे - २७ ते २९ नोव्हेंबर.

  • रिक्त जागांची यादी जाहीर करणे ३० नोव्हेंबर.

  • विशेष संवर्ग भाग २ साठी प्राधान्यक्रम भरणे - १ ते ३ डिसेंबर.

  • विशेष संवर्ग भाग २ साठी बदली प्रक्रिया चालवणे - ४ ते ६ डिसेंबर.

  • रिक्त जागांची यादी जाहीर करणे ७ डिसेंबर.

  • बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे - ८ ते १० डिसेंबर.

  • रिक्त जागांची यादी जाहीर करणे १४ डिसेंबर.

  • बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे - १५ ते १७ डिसेंबर.

  • बदलीपात्र बदली प्रक्रिया चालवणे - १८ ते २० डिसेंबर

  • रिक्त जागांची यादी जाहीर करणे २१ डिसेंबर.

  • विस्थापित शिक्षकांच्या राउंडसाठी पर्याय भरणे - २२ ते २४ डिसेंबर.

  • विस्थापित शिक्षकांचा राउंड, विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया चालवणे - २५ ते २७ डिसेंबर.

  • रिक्त जागांची यादी जाहीर करणे- २८ डिसेंबर.

  • बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे - २९ डिसेंबर.

  • अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्याचा राउंड - ३० डिसेंबर ते १ जानेवारी.

  • अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे - २ जानेवारी ते ४ जानेवारी.

  • बदली आदेश प्रकाशित करणे - ५ जानेवारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com