esakal | जेव्हा ४५ वर्षांवरील लोकांचे पूर्ण लसीकरण होईल तेव्हा औरंगाबाद सुरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

'जेव्हा ४५ वर्षांवरील लोकांचे पूर्ण लसीकरण होईल तेव्हा औरंगाबाद सुरक्षित'

'जेव्हा ४५ वर्षांवरील लोकांचे पूर्ण लसीकरण होईल तेव्हा औरंगाबाद सुरक्षित'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : कोरोनाची लस घेणे स्वेच्छिक असले तरी ३० एप्रिलनंतर ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी देणार नाही, असा इशारा औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज रविवारी (ता.१८) दिला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधला. शहरात हळुहळू कोरोनाची केसेस कमी होत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. श्री.पांडेय यांनी अंशतः लाॅकडाऊन व ब्रेक द चेनअंतर्गत पूर्ण लाॅकडाऊन, दुसरे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले त्यामुळे कोरोना कमी झाल्याची कारणे सांगितले.

शहरात अनावश्यक फिरणाऱ्या लोकांची चाचणी करण्यासाठी सध्या बारा कोरोना चाचणी केंद्रे सुरु आहेत. वय वर्षे ४५ पुढील सर्वांचे लसीकरण करणे हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. याचा आपल्याला फायदे होईल, असे श्री पांडेय म्हणाले. कोरोना लसीकरणात कोणताही खंड पडणार नसल्याचे त्यांनी शहरवासीयांना सांगितले. सध्या शहरात १०३ लसीकरण केंद्रे आहेत. तसेच बसस्थानक, रेल्वे, न्यायालये येथे लसीकरण केंद्र सुरु करणार आहोत. जेव्हा ४५ वर्षांवरील लोकांचे पूर्ण लसीकरण होईल तेव्हा औरंगाबाद सुरक्षित होईल.

लसीकरणाचा फायदा : लसीकरण करणे फायद्याचे असल्याचे सांगत श्री पांडेय यांनी आरोग्य अधिकारी नीता पाडळकर, घाटीच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांची उदाहरणे दिली. लसीकरणाचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. उलट त्याचा फायदाच होतो, असे ते म्हणाले.