Aurangabad : अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad

Aurangabad : अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आणि वसतिगृह शुल्क माफ करा, अशी मागणी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सोमवारी (ता. १९) कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे.

डॉ. येवलेंना दिलेल्या निवेदनात म्हटले कि, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. त्यातच मराठवाडा विभागात परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने उरले सुरले खरीपचे पीकही हातचे गेले आहे.

मराठवाडा विभागात जून ते जूलै कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे आठ लाख ११ हजार ८४५ शेतकरी बाधित झाले असून पाच लाख ८७ हजार ४६६.४१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मराठवाडा विभागातील ४५० महसूल मंडळापैकी २०७ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शेतकरी पाल्यांना विद्यापीठाने दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना युवासेना सचिव वरुण सरदेसाई, उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, भाविसे विद्यापीठ प्रमुख डॉ. तुकाराम सराफ यांची उपस्थिती होती.

Web Title: Aurangabad University Student Education Fee Heavy Rain Loss

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..