औरंगाबाद : व्यावसायिक नळांना मोजावे लागणार एक हजार लिटरला १४३ रुपये

महापालिकेतर्फे सर्वेक्षण सुरू, २० मीटरसाठी झाली नोंदणी
Commercial pipes cost 143 per 1000 liters
Commercial pipes cost 143 per 1000 liters sakal

औरंगाबाद : महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शहरातील मुख्य पाइपलाइनवरून नळ घेणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना मीटर बसविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत २० मीटरसाठी नोंदणी झाली असून, व्यावसायिक नळांना प्रती एक हजार लीटरला १४३ रुपये मोजावे लागणार आहेत.

महापालिकेचे प्रभारी प्रशासक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लक्ष घातले आहे. महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेत मोठ्या आकाराच्या व्यावसायिक नळ कनेक्शन व मुख्य लाइनवरून घेतलेल्या बेकायदा नळांना मीटर बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. नळांना मीटर लावल्यानंतर पाण्याच्या वापरावर मर्यादा येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार पाणी पुरवठा विभागातील उपअभियंत्यांनी प्रत्येक प्रभागात सर्वेक्षण सुरू केले आहे. आत्तापर्यंत २० नळधारकांनी वॉटर मीटरची मीटरची मागणी केली आहे. मागणी प्रमाणे नळांना मीटर बसविले जाणार आहे. त्यानंतर नळ धारकांना दरमहा बील देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com