औरंगाबाद : जूनपासून चार दिवसांआड पाण्याचे गाजर!

पाणी वाढविण्यासाठी कामांना गती दिल्याचा दावा
Aurangabad Water scarcity water supply four days from June
Aurangabad Water scarcity water supply four days from Junesakal

औरंगाबाद : शहरावरील पाणीसंकट दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेली कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. जून महिन्यापासून शहराला चार दिवसांआड पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत महापालिकेने पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची जेवढी आश्वासने दिली, ती सर्व `गाजर`च ठरली आहेत. त्यामुळे जूनपासून चार दिवसांआड पाणी देण्याचेही `गाजर`च होईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शहरातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कामांचा बुधवारी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, की शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामे सुरू आहेत.

हर्सूल तलावातून पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाच एमएलडी पाणी वाढणार आहे. रोजाबाग येथील नहर-ए-अंबरची लाइन सुरू केल्याने त्यातून एक एमएलडी पाणी वाढले. जायकवाडीतून पाच एमएलडी पाणी वाढले आहे. सध्या अकरा एमएलडी पाणी वाढले आहे. एमआयडीसीने तीन एमएलडी पाणी दिल्याने टॅंकरचे पाणी वाचले आहे. सध्या सिडको एन-१ येथून ६१ टॅंकरच्या २८५ फेऱ्या होत आहेत. त्यामुळे सध्या शहराला समान पाच दिवसांआड समान पाणीपुरवठा केला जात आहे. जूनपासून पाणीपुरवठा चार दिवसांआड करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.

जीवन प्राधिकरणाच्या प्रयत्नांना आले यश

उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, या नियोजनात महापालिका अधिकारी कमी पडले; पण जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे नागरिकांना दिलासा देता आला, असे पांडेय म्हणाले. हर्सूलमधून पाच एमलडी पाणी वाढविणे, जायकवाडीतून पंप बदलून पाणी उपसा वाढविणे, नहर-ए-अंबारीच्या पाण्याचा वापर करणे, या उपाययोजना जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सुचविल्याचे पांडेय म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com