‘घिसीपीटी लाईफ मै नही जिना चाहता’ स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad news
‘घिसीपीटी लाईफ मै नही जिना चाहता’ स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

‘घिसीपीटी लाईफ मै नही जिना चाहता’ स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : परीक्षेच्या आदल्या दिवशी ‘घिसीपीटी लाईफ मैं नही जिना चाहता’ या आशयाचे अभिनेता रणबीर कपूरच्या डायलॉगचे स्टेटस ठेवून १९ वर्षीय तरुणाने जीवन संपविले. हा दुर्दैवी प्रकार २२ नोव्हेंबररोजी मयूरनगर, हडको परिसरात पहाटे उघडकीस आला. वैभव राजेंद्र फपाळे (१९, मयूरनगर, एन-१२, हडको) असे मृत तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

मृत वैभव याने वयाच्या बावीसाव्या वर्षांपर्यंत शिक्षण, पंचवीसपर्यंत नोकरी, सव्वीस वर्षानंतर विवाह, तिसाव्या वर्षी मुले आणि साठाव्या वर्षी निवृत्ती, त्यानंतर मृत्यूची वाट पाहायची, असे रटाळ जीवन नको, असे स्टेटस ठेवले होते. वैभव हा शहरातील एका महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होता. वैभवाचे वडील नोकरी निमित्त नायजेरिया देशात गेले होते. वैभव हा आई बहिणीसह राहत होता. दरम्यान, रविवारी (ता.२१) आई व बहीण एका लग्न समारंभासाठी गेले होते. तर वैभवाचा सोमवारी पेपर असल्याने घरीच होता. आई-बहीण रात्री घरी आल्यानंतर वैभव अभ्यास करत असेल अशी समजूत करुन दोघी मायलेकी झोपी गेल्या. मात्र पहाटेपर्यंत लाईट सुरू असल्याने दार लोटून बघितले असता वैभवने गळफास घेतलेला दिसून आले. दरम्यान त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार ए.आर. इराक करीत आहेत.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

सातारा परिसरातही वृद्धाची आत्महत्या

सातारा परिसरातील सदानंदनगरात राहणाऱ्या ५९ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रविवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली. बाळू सखाराम धनेधर (५९ रा. सदानंदनगर, सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळू यांचे चहाची हॉटेल असून यावर त्यांचा चरितार्थ चालत होता. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. त्यांची पत्नी त्यांना व्यवसायात मदत करते. गेल्या काही दिवसांपासून बाळू हे आजारपणामुळे त्रस्त होते. रविवारी हॉटेलवर असताना बाळू हे घरी एकटेच होते. पत्नी घरी आल्यानंतर बघितले असता त्यांनी पतीने गळफास घेतल्याचे आढळले. यावेळी त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रभान गवांदे करीत आहेत.

loading image
go to top