esakal | औरंगाबाद : ज्ञानगंगा स्कूलवर प्रशासक नियुक्तीचा ठराव मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

zp office.jpg

प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने सभागृहाने हस्तक्षेप टाळावा : शिक्षणाधिकारी जैस्वाल 

औरंगाबाद : ज्ञानगंगा स्कूलवर प्रशासक नियुक्तीचा ठराव मंजूर

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वडगाव कोल्हाटी येथील ज्ञानगंगा पब्लिक स्कूल या संस्थेतील गैरकारभाराची दखल घेऊन या शाळेवर प्रशासनाने तात्काळ प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.२०) जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत केली असता उपस्थित सदस्यांनी ठरावाला मान्यता दिली. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सभागृहाने यामध्ये हस्तक्षेप करणे उचित ठरणार नाही असे विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी सभागृहाला सांगितले. मात्र प्रशासक नियुक्तीच्या मागणीवर सदस्य ठाम राहिल्याचे दिसून आले.

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी
ज्ञानगंगा पब्लिक स्कूलचे योगेश पाटील यांनी बोगस कागदपत्र तयार करून मंगला निकम यांची सेवा पुस्तिका तयार केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. मंगला निकम यांचे आदेश रद्द करण्यात यावेत. मुख्याध्यापक पद रद्द करावे तसेच संस्थेवर तात्काळ प्रशासक नेमावा तसेच बाळू कदम आणि श्रीमती फुके यांची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकांना निधी दिला जात नाही : आ. गोरंट्याल यांचा सरकारला घरचा आहेर 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड यांनी ज्ञानगंगा पब्लिक स्कूल मधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवावा असे सुचविले. बोगस रेकॉर्ड आधारे संस्थेतील शिक्षकांचे वेतन काढून लाखोंचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याप्रकरणी प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी किशोर बलांडे, किशोर पवार,मधुकर वालतुरे,केशव तायडे,शिवाजी पाथ्रीकर यांनी केली तसेच. कोर्टामध्ये प्रशासनाने आपली बाजू मांडावी असे एल.जी. गायकवाड म्हणाले. 

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

बहुजनांच्या संस्था बरखास्त करण्याचा डाव उधळून लावू : रमेश गायकवाड 
बहुजनांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या शिक्षण संस्था बरखास्त करण्याचा डाव आम्ही उधळून लावू असा इशारा यावेळी रमेश गायकवाड यांनी दिला. चेंज रिपोर्ट मुळे बहुजनांच्या संस्था देशोधडीला लागल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात 

अनियमितता झाली असेल तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा. मात्र संस्था बरखास्त करण्याचे प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते हाणून पाडू असा इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला. प्रशासक नेमावा, चौकशी करावी.धर्मादाय आयुक्त तसेच न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत संस्था बरखास्ती बाबत कारवाई करू नये अशी मागणी यावेळी गायकवाड यांनी केली. 

Edited By Pratap Awachar
 

loading image
go to top