मुख्यमंत्री सहायता निधीत विद्यापीठाकडून २० लाख रुपयांचा निधी

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेतनातील एक किंवा दोन दिवसांचा निधी जमा करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले
bamu
bamubamu

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ‘कोविड-१९’ अंतर्गत २० लाख ६८ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्याहस्ते शुक्रवारी (ता. ४) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे निधीचा धनादेश सुर्पुद करण्यात आला. विद्यापीठातर्फे कोविड काळात आतापर्यंत ८१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेतनातील एक किंवा दोन दिवसांचा निधी जमा करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. या आदेशानंतर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या आवाहनानूसार संवैधानिक अधिकारी, वर्ग एक अधिकारी, प्राध्यापक यांनी दोन दिवसांचे वेतन तर उर्वरित कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेतला. ३८१ जणांचा २० लाख ६८ हजार रुपयांचा निधी जमा झाला. यामध्ये कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व संवैधानिक अधिकारी, अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी योगदान दिले.

bamu
मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणारच; परवानगी असो वा नसो - विनायक मेटे

डॉ. येवले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याकडे निधीचा धनादेश सुर्पुद करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात १७ लाख ५५ हजार रुपयांची, आणि ९ लाख रुपये तर, दुसऱ्या टप्प्यात नऊ लाख रुपये आणि आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ३५ लाख रुपये अशाप्रकारे आजपर्यंत एकूण ८१ लाख ७४ हजार ५०३ रुपयांचा निधी देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com