Ajit Pawar
Ajit PawarSakal

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी ७१ कोटी; अजित पवार

झेडपीची दोन मजले व फर्निचर निधीसाठी पवारांचे आश्वासन; जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा आता ३६० कोटींचा

बीड : जिल्ह्याच्या झोळीत विकासासाठी शुक्रवारी (ता. २१) आणखी ७१ कोटी रुपयांची भर पडली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या २८८ कोटी ८८ लाख रुपयांच्या आराखड्यात ७१ कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांची वाढ होऊन आता ही रक्कम ३६० कोटी रुपये इतकी केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केली.मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा वार्षिक योजनेची विभागीय आढावा बैठक झाली.

या बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. तर, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलिस अधीक्षक आर. राजा, जिल्हा नियोजनअधिकारी राधाकृष्ण ईघारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. कोलप, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदविला. पान ३ वर

Ajit Pawar
आपत्तीकाळात वादात सापडलेले डॉ. गिते बीडला ‘डीएचओ’

ड्रेनेज व पोल शिफ्टींगसाठी १० कोटी

बीड शहरातून जात असलेल्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्यवळण रस्ता ते बाह्यवळण रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाच्या अंदाजपत्रकात ड्रेनेज व पोल शिफ्टींगसाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरेटीने तरतूद केलेली नसल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून देत निधीची मागणी अजित पवार यांच्याकडे केली.

श्री. पवार यांनी या कामासाठी तत्काळ १० दहा कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगत तत्काळ नॅशनल अ‍ॅथॉरेटीकडून आलेल्या अंदाजपत्रकानुसार पोल शिफ्टींग व ड्रेनेज बाबत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. बायपास टू बायपासच्या १२ किलोमीटर अंतराचे काम सध्या सुरु असून, शहराच्या दोन्ही बाजूने प्रवेश करत असताना आठ किलोमीटरचे डांबरीकरण व शहरातून जात असलेला चार किलोमीटरवर सिमेंट रस्ता मंजूर केलेला आहे. या दोन्ही रस्त्याच्या बाजूला विद्युत व्यवस्था ज्यामध्ये पोल शिफ्टींग व इतर बाबींचा समावेश आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली नसल्याने शहरातील या रस्त्यासाठी नाली बांधकाम व पोल शिफ्टींगसाठी १० कोटी रुपयांची गरज होती.

Ajit Pawar
मल्टी मोडल हबला मेट्रो निओची संमती

प्रतिपंचायत समितीला दीड कोटी

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी किती निधी हवा आहे, याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवा, तसेच जिल्ह्यातील पंचायत समितींना फर्निचरसाठी लागणाऱ्या प्रति पंचायत समिती सुमारे दीड कोटी निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याची सूचना अजित पवार यांनी या बैठकीत केली. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाला सुसज्ज इमारत आहे का? ही इमारत कधी बांधलेली आहे, नव्याने इमारत बांधण्याची आवश्यकता आहे का? याबाबतची ही त्यांनी चौकशी केली.

Ajit Pawar
महापालिकेचे ४० नव्हे, तर ८० प्रकल्प; मंत्री आव्हाड यांच्या आरोपात तथ्य

‘तो’ फोटो कशाचा? - पवार

व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन सहभागी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या पाठीमागे कंकालेश्वर मंदिराचा फोटो स्क्रीनवर दिसल्यानंतर ‘हे मंदिर नेमके कशाचे’ असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी कंकालेश्वर या प्राचीन मंदिराची माहिती अवगत करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com