बुरखा गँगच्या आठ महिलांना अटक, अडीच लाखांचे दागिने जप्त

महिलेचे दागिने लुटून चोरट्याचे पलायन
महिलेचे दागिने लुटून चोरट्याचे पलायन
Summary

गेल्या काही दिवसांपूर्वी सायरा बशीर शेख (वय ५५ रा. शंभुनगर, चाणक्यपुरी) या सोने खरेदी व दुरूस्तीसाठी सराफा बाजारात आल्या होत्या. त्यावेळी त्यांची दागिने असलेली पर्स लांबविण्यात आली होती. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

औरंगाबाद : सराफा बाजारात Sarafa Market खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पर्स लांबवत सोन्याचे दागिने आणि कापड बाजारपेठेतून कपडे चोरलेल्या बुरखा गँगमधील आठ महिलांना सिटी चौक पोलिसांनी City Chowk Police अखेर अटक केली. या बुरखा गँगकडून पोलिसांनी तब्बल अडीच लाखांचे दागिने आणि कपडे जप्त केले आहेत. ही कारवाई बुधवारी (ता.२३) करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून बुरखा गँगने Bhurkha Gang सिटीचौक पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद असताना देखील ही गँग पोलिसांच्या हाती लागत नव्हती. अखेर सिटी चौक पोलिसांना बुरखा गँगमधील आठ महिलांना अटक करण्यात यश आले. गेल्या काही दिवसांपूर्वी सायरा बशीर शेख (वय ५५ रा. शंभुनगर, चाणक्यपुरी) या सोने खरेदी व दुरूस्तीसाठी सराफा बाजारात Auragnabad आल्या होत्या. त्यावेळी त्यांची दागिने असलेली पर्स लांबविण्यात आली होती. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार, दुय्यम निरीक्षक अशोक भंडारे, सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. सय्यद, उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, खैरनार, पोलिस नाईक शेख गफार, संजय नंद, तायडे, पटेल, देशराज मोरे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी यांनी बुरखा गँगचा मिसारवाडी भागात शोध घेतला. त्यावेळी दोन बुरखाधारी महिला यांना पकडण्यात आले.bhurkha gang members arrested in aurangabad

महिलेचे दागिने लुटून चोरट्याचे पलायन
पैठण तालुक्यात अवैध दारु विकणारा अटकेत, पाचोड पोलिसांची कारवाई

पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही महिलांनी सराफा, रंगारगल्ली, कपडा मार्केटमधून सोन्याचे दागिने आणि कपडे चोरल्याची कबुली दिली. तसेच यात आणखी सहा महिला साथीदार असल्याचेही सांगितले. त्यावरुन किराडपुरा, रोशनगेट, काचीवाडा, शहाबाजार या भागातून इतर सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, साड्या व कपडे असा अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक बी. ई. मुजगुले आणि जमादार शेख महेबुब करित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com