बागडे, दानवे, कराडांचे फोटो न छापल्याने भाजपचे सभेवर बहिष्कार

औरंगाबाद - कृषी बाजार समितीच्या वार्षिक सभेत आमदार हरिभाऊ बागडे, व दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोटो वार्षिक अहवालावर न छापल्यामुळे भाजपने वार्षिक सभेवर बहिष्कार घातला.
औरंगाबाद - कृषी बाजार समितीच्या वार्षिक सभेत आमदार हरिभाऊ बागडे, व दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोटो वार्षिक अहवालावर न छापल्यामुळे भाजपने वार्षिक सभेवर बहिष्कार घातला.

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Aurangabad Agriculture Producing Market) वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर झालेल्या वार्षिक अहवालात फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade), केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad), औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे (Atul Save) यांचा फोटो ना छापल्यामुळे याचा जाब भाजपतर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळांना विचारण्यात आला. समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे या सभेवर बहिष्कार टाकत भाजप पदाधिकारी निघून गेले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये वार्षिक अहवाल मांडतांना सचिवांनी लेखा-जोखा मांडत असताना भाजपचे (BJP) तालुकाध्यक्ष राम बाबा शेळके यांनी प्रशासक मंडळ व सचिवांना प्रश्न केला की प्रोटोकॉलप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधींचे फोटो आणि नावे वार्षिक अहवाल पुस्तके यायला पाहिजेत. तू आलेला नाही असं दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोटोही या पुस्तिकेत का नाही असे विचारत गोंधळ घातला. यावेळी उत्तर देताना सचिव म्हणाले की मला प्रशासक मंडळाने जे सांगितले त्यानुसार आम्ही फोटो छापल्याचे उत्तर दिले.

औरंगाबाद - कृषी बाजार समितीच्या वार्षिक सभेत आमदार हरिभाऊ बागडे, व दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोटो वार्षिक अहवालावर न छापल्यामुळे भाजपने वार्षिक सभेवर बहिष्कार घातला.
Bharat Band : हिंगोलीत कृषी कायद्यांविरोधात धरणे आंदोलन

दरम्यान समाधानकारक उत्तर दिले नाही. यासह मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे म्हणाले, की आम्ही नवीन आहोत व प्रोटोकॉलप्रमाणे कोणाचे फोटो छापावे कुणाचे नाही आम्हाला माहीत नव्हते व सचिवांनी आम्हाला सांगितले नाही. पुढच्या वेळी असं होणार नसल्याचे सांगितले. दरम्यान ही उत्तरही समाधानकारक नसल्याने भाजप तालुकाध्यक्ष राम बाबा शेळके यासह बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे व सर्व माजी संचालक मंडळांनी या सभेवर बहिष्कार टाकला व घोषणाबाजी करत सभागृह सोडले.

आम्ही निषेध करतो

राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या या प्रशासकीय मंडळातर्फे जाणीवपूर्वक भाजपच्या लोकप्रतिनिधींचे फोटो छापले नाही. आमचे राजू शिंदे सभापती असताना आम्ही त्या वेळी आमदार कल्याण काळे यांचा फोटो छापला होता. आम्ही कधीच असा भेदभाव केला नाही व वेगळ्या पातळीवर ही गेलो नाही. मात्र या प्रशासक मंडळाची भूमिका ही राजकीय व संकुचित आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो, असे माजी सभापती राधाकिशन पठाडे म्हणाले.

औरंगाबाद - कृषी बाजार समितीच्या वार्षिक सभेत आमदार हरिभाऊ बागडे, व दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोटो वार्षिक अहवालावर न छापल्यामुळे भाजपने वार्षिक सभेवर बहिष्कार घातला.
नांदेडमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी बस चिखलात रुतली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com