पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी

file photo
file photo

औरंगाबाद ः जूनमध्ये होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. सत्ता नसली तरी स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपतर्फे जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी संपर्क अभियान जनजागृती करण्यात येत आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर पदवीधर मतदारसंघाची तयारी सुरू करण्यात आली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी आठ जिल्हे व ७६ तालुक्यांत तीन लाख ४८ हजार मतदार आहेत. युती सरकार असताना भाजप पदवीधर मतदारसंघ जिंकणे सोपे होते; मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे भाजपला या जागेसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 

भाजपतर्फे पदवीधर मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. सध्या पदवीधर नोंदणी सुरू आहे. या नोंदणीसाठी प्रमुख म्हणून प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, सहप्रमुख म्हणून प्रवीण घुगे यांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून सर्व मतदारसंघात बूथनिहाय जनजागृती अभियान सुरू आहे. यात मतदारांच्या भेटीही करण्याचे काम भाजपतर्फे सुरू आहे. 

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक

या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, किशोर शितोळे व अन्य काही उमेदवार काही जणांच्या नावांची चर्चा आहे. मात्र अद्यापही भाजपतर्फे या निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. इच्छुकांतर्फे स्वतंत्रपणे तयारी केली जात आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार सतीश चव्हाण पुन्हा ही निवडणूक लढवण्याची शक्यता असल्यामुळे भाजपपुढे मोठे आव्हान राहील. या निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपला मोठी तयारी करावी लागणार आहे. 
हेही वाचा - कोरोनाला भिऊ नका, ही घ्या काळजी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com