esakal | शिवसेनेवर दबाव आणू शकतील एवढी डॉ. कराडांची क्षमता नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant khaire

शिवसेनेवर दबाव आणू शकतील एवढी डॉ. कराडांची क्षमता नाही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: शिवसेनेवर दबाव आणू शकेल, इतकी डॉ. कराड यांची क्षमता नाही, शिवसेनेला कुणीच नमवू शकत नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार या शहराला आणि जिल्ह्याला दिले आहेत, त्यामुळे शिवसेनेला शह देण्याची किंवा रोखण्याची हिम्मत खासदार व मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यात नाही, असा चिमटा शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी (ता. १२) काढला.

प्रसार माध्यमांशी बोलताना श्री. खैरे म्हणाले, की मी चारवेळा जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून आलो, तेव्हा मला मंत्रीपदाची संधी होती, मात्र स्थानिक पातळीवर भाजप व इतरांनी माझ्या नावाला विरोध केला. कुणीकुणी विरोध केला हे मला माहीत आहे, पण आता त्यावर बोलण्यात अर्थ नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले असेल, पण मला विरोध केला नसता तर ते याआधीच मिळाले असते.

हेही वाचा: चांगली बातमी! अखेर पोलिस भरतीची प्रतिक्षा संपली

पक्षात गटबाजी नाही
शिवसंपर्क मोहिमेवरून गटबाजीचे होत असलेले आरोप खैरे यांनी फेटाळून लावले. जिल्ह्यात व राज्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसंपर्क मोहीम सुरू आहे. अंबादास दानवे जिल्हाप्रमुख असल्यामुळे त्यांनी याचे नियोजन केले आहे. आम्ही दोघेही शिवसंपर्क मोहीम राबवत आहोत, वेळ मिळेल तसा मी देखील ग्रामीण भागातील मोहिमेत सहभागी होणार आहे, त्यामुळे आमच्यात कुठलीही गटबाजी नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

हेही वाचा: औरंगाबादेत चिकनच्या दराने केले 'रेकॉर्ड ब्रेक'

एमआयएमचे स्वप्न पूर्ण होणार नाही
एमआयएमने औरंगाबाद महापालिकेचा महापौर आमच्या पक्षाचा असेल असा दावा केला आहे, यावर त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, महापालिकेवर व या जिल्ह्यावर कायम भगवा फडकत आला आहे, यापुढेही तो असाच फडकत राहील, इतर कुठल्याही रंगाचा झेंडा इथे फडकणार नाही, आम्ही फडकू देणार नाही, असेही खैरे म्हणाले.

loading image