रिक्षावाला इतका मोठा कसा होतो? हे पैसे टरबुजाने दिले, खैरेंचे आरोप

रिक्षावाला इतका मोठा कसा होतो? हे पैसे टरबुजाने दिले, खैरेंचे आरोप

औरंगाबाद : एकीकडे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांना परत येण्यासाठी भावनिक आवाहन करत असताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खैरे म्हणाले की, गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना 7,000 कोटी रुपये देण्यात आले असून हा सर्व खर्च टरबुजाने केल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. (Chandrakant Khaire Allegation On BJP)

रिक्षावाला इतका मोठा कसा होतो? हे पैसे टरबुजाने दिले, खैरेंचे आरोप
"श्रीनिवास तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदाराची स्वतःविरोधातच पोस्ट

संघाच्या लोकांना विचारा, संघ परिवाराला देखील आम्हीदेखील डोनेशन देतो. मात्र ते आपला पैसा तिकडे वापरतात असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. ते म्हणाले की, एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा? एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा डुप्लिकेट शिवसैनिक असल्याचेही खैरे म्हणाले. आनंद दिघेंनी शिंदेना रिक्षा चालवताना नगरसेवक केले, पण ते आनंद दिघेंना विसरले. हा रिक्षावाला माणूस इतका मोठा कसा होतो? एवढे पैसे कोठून आले? याने कोट्यावधी रुपये छापलेत. सुरत, गुवाहाटीला विमानाने गेले. पैसे कोठून आले? हे पैसे टरबुजने दिल्याचे खैरे यांनी यावेळी म्हटले आहे.

रिक्षावाला इतका मोठा कसा होतो? हे पैसे टरबुजाने दिले, खैरेंचे आरोप
एकनाथ शिंदे : बंडखोरांची व्होटबॅंक निर्माण होणार, Sakal Survey तील निष्कर्ष

...याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

‘एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुक्कर, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे. त्यांचा बाप काढायचा आणि दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय, असे ट्वीट बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com