esakal | औरंगाबादेत मनसेला झटका,सात पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे

औरंगाबादेत मनसेला झटका,सात पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : शहरवासीयांना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करा, अन्यथा मनपा आयुक्त तथा प्रशासकांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कापण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने ता.७ जुलैला देण्यात आला होता. त्यानुसार, रविवारी (ता.१८) पहाटे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन कापले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या वतीने मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन कोलमडलेले आहे. शहरवासीयांना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी ता.७ जुलै रोजी मनसेचे जिल्हा संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर, उपशहराध्यक्ष राहुल पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संकेत शेटे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत दहीवाडकर आणि वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक मनीष जोगदंडे यांनी पत्रकार परिषद घेत सिटी वॉटर युटिलिटी कंपनी व महानगर पालिका यांच्यात झालेल्या २०११ च्या करारानुसार पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचे ठरले होते. charges file against maharashtra navnirman sena office bearers in aurangabad glp 88

हेही वाचा: मनसेने तोडले औरंगाबाद पालिका आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन

वॉटर युटिलिटी कंपनीने १ एप्रिल २०१२ पासून कामाला सुरवात करावी, अशी नोटीस मनपाच्या वतीने देण्यात आली होती. प्रत्यक्षात ता.१ सप्टेंबर २०१४ पासून कंपनीने काम हाती घेतले. त्यामुळे दरवर्षी पाणीपट्टीत वाढत होत गेली. सध्या शहरवासीयांना चार हजार ५० रुपये इतकी वार्षिक पाणीपट्टी आकारली जात असल्याचे म्हटले होते. तसेच आठवड्यातून दोन वेळा शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी मनपा प्रशासनाला दहा दिवसांचा अवधी देत असून, त्यानंतर आयुक्त पांडेय यांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन कापण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला होता. त्यानुसार, रविवारी पहाटे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पांडेय यांच्या बंगल्याबाहेरील नळ कनेक्शन कापले.

हेही वाचा: दोघांचे प्रेम पाहून पोलिस भारावले! चार किलोमीटर पळवल्यानंतर...

यांच्यावर गुन्हा दाखल

पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे सिटी चौक ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बिपीन नाईक, वैभव मिटकर, संकेत शेटे, राहुल पाटील, प्रशांत दहिवाडकर, मनीष जोगदंडे यांच्यासह अन्य एकजण अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image