esakal | छत्रपती संभाजीराजे कारखान्यातर्फे ५० हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Sambhaji Raja manufactures 50 Thousand liters sanitizer

मदार रोहित पवार यांनी आपल्या कारखान्यात तयार केलेल सॅनिटायझर मोफत पाठवले आहे. वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनीदेखील त्यांच्या ताब्यात असलेल्या छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्यात सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे.

छत्रपती संभाजीराजे कारखान्यातर्फे ५० हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व देशात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. मराठवाड्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या चित्तेपिंपळगाव येथील छत्रपती संभाजीराजे महाराज साखर कारखान्यानेही सॅनिटायझर उत्पादनासाठी पुढे येत उत्पादन सुरू केले आहे.

पहिल्या टप्प्यात ५० हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

देशावर कोरोनाचे मोठे संकट आल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून सातत्याने हात धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभाग, हॉस्पिटल, प्रशासकीय यंत्रणा अशा सर्वच ठिकाणी सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरचे उत्पादन सुरू झाले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कारखान्यात तयार केलेल सॅनिटायझर मोफत पाठवले आहे. वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनीदेखील त्यांच्या ताब्यात असलेल्या छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्यात सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही निर्मिती सुरू करण्यात आल्याचेही श्री. बागडे यांनी सांगितले. 


पहिल्यांदाच आम्ही सॅनिटायझरचे उत्पादन करीत आहोत. यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळवल्या असून, प्रत्यक्षात उत्पादन सुरू केले आहे. मागणी आणि गरज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने उत्पादन वाढवण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजार लिटर सॅनिटायझर तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर मागणी वाढेल तसे एक लाख लिटरपर्यंत उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यात येईल. ८० टक्के अल्कोहोलचा वापर करीत अधिक प्रभावी सॅनिटायझर तयार करीत आहोत. 
- आमदार हरिभाऊ बागडे 
 

loading image