Chhatrapati Sambhajinagar : भाजपच्यावतीने ३० जूनपर्यंत मोदी @९ जनसंपर्क अभियान Chhatrapati Sambhajinagar BJP Modi @9 public campaign | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

Chhatrapati Sambhajinagar : भाजपच्यावतीने ३० जूनपर्यंत मोदी @९ जनसंपर्क अभियान

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदी @९ विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. हेच अभियान शहर व जिल्ह्यातही घेण्यात येणार आहे. या अभियातर्गत जिल्हा, मंडळ शक्ती केंद्र व बूथ पातळीवर वेगवेगळे स्वरूपाचे कार्यक्रम घेत सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी बुधवारी (ता.३१) पत्रकार परिषदेत दिली.

बोराळकर पुढे म्हणाले की, हे अभियान आजपासून शहर व जिल्ह्यात सुरु झाले. यात संपर्क से समर्थन यापासून हे अभियान सुरु झाले. यात सर्व नेते, मंत्री सहभागी घेणार असून देशपातळीवर एका मंत्र्याला दोन लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते मंडळी त्यांच्या विभागातील नेत्यांच्या घरी जाऊन सरकारच्या ५५० विविध योजनांची माहिती देणार आहे.

यासह प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील राजकीय सोडता विविध क्षेत्रात बुद्धिवंत असलेल्या एक हजार लोकांशी संवाद साधणार आहे. यासह एक जाहीर सभाही याच काळात घेतली जाणार आहे. यासह सोशल मीडिया ब्लॉंगर, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. २१ जूनला शहरात १०० ठिकाणी योगाचे कार्यक्रम घेणार आहे. यासह देशभरातील सर्व बूथ प्रमुखांशी पंतप्रधान संवाद साधणार आहे.

संयोजकपदी हर्षवर्धन कराड

या अभियानासाठी शहरातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी हर्षवर्धन कराड यांना देण्यात आली आहे. तिन्ही मतदारसंघाचे कराड हे संयोजक म्हणून काम पाहणार आहे. असेही शिरीष बोराळकर यांनी सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणीतील निमंत्रित सदस्य अनिल मकरिये, अभियानाचे संयोजक हर्षवर्धन कराड उपस्थित होते.