पुराणवस्तू संग्रहालयाचे लवकरच नूतनीकरण

साडेनऊ कोटींचा खर्च अपेक्षित : डीपीआरही तयार
पुराणवस्तू संग्रहालयाचे लवकरच नूतनीकरण

औरंगाबाद : महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सुमारे साडेनऊ कोटी रुपये खर्च करून इमारतीची डागडुजी, लाईट ॲन्ड साऊंड शो, विद्युत रोषणाईची कामे केली जाणार आहेत.

पुराणवस्तू संग्रहालयाचे लवकरच नूतनीकरण
Chopper Crash : चूक इथं झाली? लवकरच समोर येणार अहवाल

महापालिकेने सुभेदारी विश्रामगृहाजवळ सुमारे २५ वर्षापूर्वी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाची इमारत उभारलेली आहे. हे संग्रहालय १९९९ मध्ये खुले करण्यात आले. संग्रहालयात शिवकालीन शस्त्रे, वस्तू, नाणी, चित्रे, भांडी, हस्तलिखित अशा चार हजार वस्तूंचा संग्रह आहे. दिवंगत संस्थापक संचालक डॉ. शांतीलाल पुरवार, लांबतुरे, रुणवाल यांच्यासह इतरांनी या ऐतिहासिक वस्तू दिल्या आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक संग्रहालयाला भेट देतात. मात्र, ही इमारत जुनी झाल्याने पावसाळ्यात गळती लागत आहे. गळतीमुळे संग्रहालयातील वस्तू खराब होत आहेत. त्यामुळे पर्यटकांसोबतच इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. इमारतीच्या डागडुजीसह इतर कामांसाठी सुमारे नऊ कोटी ५० लाख रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला असल्याचे श्री. पांडेय यांनी नमूद केले.

पुराणवस्तू संग्रहालयाचे लवकरच नूतनीकरण
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा तब्बल ४९ दिवसानंतर मृत्यू...

‘डीपीसी’तून निधीसाठी प्रयत्न

पुराणवस्तू संग्रहालय शहरातील आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून नूतनीकरणाच्या कामासाठी निधी मिळावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला जाणार असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.

संशोधन केंद्राचा प्रस्ताव बारगळला

तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी पुराणवस्तू संग्रहालयाच्या परिसरात छत्रपती शिवजी महाराज संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्तावही तयार करण्यात आला पण त्यात पुढे प्रगती झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com