या वर्षी चिकनला मिळाला विक्रमी दर! शहरात चिकनचे वेगवेगळे दर

शहरातील अनेक भागात चिकनचे वेगवेगळे दर दिसून येतात
chicken
chickenchicken

औरंगाबाद: मागील वर्षी कोरोनाच्या लाटेत पोल्ट्री (chicken rate in covid 19) चालकांना जबरदस्त आर्थिक फटका सहन करावा लागला होता. मात्र दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन (lockdown) होते तरीही चिकन ची चलत राहिली आहे. चिकनचे दर विक्रमी २४० रुपयांपर्यंत गेले होते. आता उत्पादनात वाढ झाल्याने चिकनचे दर १६० ते १८० रुपये किलो पर्यंत खाली आले आहेत. मात्र कित्येक ठिकाणी व्यापारी लॉकडाऊनकचे कारण पुढे करत चिकन २०० रुपये किलो पर्यंत विक्री करत आहे. शहरातील अनेक भागात चिकनचे वेगवेगळे दर दिसून येतात. कुठे १६० ते १८० तर कुठे २०० रुपये असे दर आहे.

कोरोना, लॉकडाऊन असला तरी चिकनच्या विक्रीवर २०२१ मध्ये जास्त फरक पडला नाही. हॉटेल, लग्न, सभारंभातही चिकनची सर्वाधिक मागणी असते. सध्या हॉटेल मधून फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असली तरी ग्राहकांनी चिकनची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. चिकन खरेदी करतांना ग्राहकांच्या लुटीचे प्रकार सुद्धा समोर येत आहे.

chicken
कौतुकास्पद! वृद्ध दाम्पत्याने बैलगाडीत जाऊन घेतली कोरोनाची लस

अनेक ठिकाणी विक्रेत्यांकडील किंमती मध्ये तफावत दिसते. प्रत्येक जण आपआपल्या परिने किंमती निश्‍चित करुन चिकनची विक्री करत आहे. त्यामुळे ग्राहकांना किलोमागे २० ते ४० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. सध्या जिंवत कोंबडी १२० रुपये किलो मिळत आहे. तर चिकन १६० ते १८० रुपये किलो असतांना कित्येक ठिकाणा याचा दर २०० रुपयांपेक्षा जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com