दोन उंदीर सोडायला गेला अन् पाचशेचा दंड भरून आला!

संचारबंदीत फिरणाऱ्यांचे बहाणे अनेक, कोरोनातही निघाला होता पिंजरा घेऊन
mice
micemice

औरंगाबाद: ‘‘संचारबंदीत कुठे फिरताय...? असे पोलिसांनी विचारताच ‘‘साहेब घरात उंदीर लई त्रास देत्यात, त्येनला पकडून बाहेर सोडायला जातोय...असे उत्तर एका नागरिकाने दिले. पोलिसांनीही मग ‘मी ओळखूनि आहे, सारे तुझे बहाणे...’ या न्यायाने त्याचे काहीएक ऐकून न घेता उंदीर सोडायला येणाऱ्याला पाचशेच्या दंडाची पावती दिली. ही पावती पाहून ‘एक उंदीर अडीचशेला पडला राव...! म्हणत त्या नागरिकानेही कपाळावर हात मारून घेतले!

हा एक प्रातिनिधीक प्रकार औरंगपुरा चौकात आज घडला. असे वेगवेगळे बहाणे करून अनेकजण बाहेर फिरत आहेत. कोरोनाचे गांभीर्य नसलेल्या अशा लोकांना वेळीच आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे. ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कठोर निर्बंध लावून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. तथापि, काहीजणांना कोरोनाचे अद्यापही गांभीर्य वाटत नसल्याचे जाणवत आहे. पहिल्या दिवशी गुरूवारी (ता. १५) कोरोनाकाळातही घराबाहेर पडणारे काही ना काही बहाने सांगताना दिसले.

औरंगपुरा चौकात पोलिस उपनिरीक्षक महादेव गायकवाड व त्यांचे सहकारी बंदोबस्तावर होते. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास एकजण तिथून जात असताना पोलिसांनी त्याला बाहेर फिरण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्याने जवळचा पिंजरा आणि त्यात पकडलेले दोन उंदीर दाखवत आपण घरी पकडलेले उंदीर बाहेर सोडायला जात असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगितले. केवळ अत्यावश्‍यक कामासाठीच घराबाहेर पडा असे सारेजण जीव तोडून सांगत आहेत आणि तुम्ही उंदीर सोडायचे म्हणून बाहेर फिरता असे सुनावत त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्या व्यक्तीला ५०० रूपयाचा दंड आकारण्यात आला. एक उंदीर अडीचशेला पडल्याचा त्रागा करीत तो नागरिक कपाळावर हात मारून घरी निघून गेला.!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com