औरंगाबाद शहरात मंगवाळपासून ५ मार्गावर धावणार सिटी बस

राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येईल, असे रविवारी (ता. सहा) सांगण्यात आले होते.
city bus
city buscity bus

औरंगाबाद: कोरोना संसर्गामुळे (covid 19 infection) बंद करण्यात आलेली शहर बससेवा आता मंगळवारपासून (ता. सात) पुन्हा धावणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच मार्गावर १६ बस धावणार असल्याचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या शहर बस विभागातर्फे कळविण्यात आले आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने राज्य शासनानाच्या आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या काळात शहर बससेवा बंद केली होती. दरम्यान बसून आलेल्या बसेसचा वापर कोरोना कामासाठी करण्यात आला. महापालिका व जिल्हा प्रशासनाला या बस देण्यात आल्या होत्या. दरम्यान राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे (aurangabad city bus started) .

त्यानुसार सोमवारपासून (ता. सात) शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. असे असले तरी शहर बस सुरू झाल्या नव्हत्या. राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येईल, असे रविवारी (ता. सहा) सांगण्यात आले होते. आता मंगळवारपासून (ता. आठ) शहर बस रस्त्यावर उतरणार आहेत. टप्प्या-टप्प्याने बससेवा सुरू केली जाणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून सिडकोबस्थानकावरून पाच मार्गावर १६ बस धावतील. बसच्या २४१ फेऱ्या होतील. सर्व बसेस निर्जंतुक केलेल्या असतील. प्रवास करताना मास्क, सेनिटायझर वापरणे व शासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यातील बस सुरू केल्या जाणार असल्याचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर व उप व्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी दिली.

city bus
माणुसकी जिवंत आहे....रिक्षाचालकाच्या प्रमाणिकपणाचं होतंय कौतुक

या मार्गांवर बस सेवा

मार्ग क्रमांक- ४
सिडको ते रेल्वे स्टेशन
मार्गे - टीव्ही सेंटर

मार्ग क्रमांक-५
औरंगपुरा ते रांजणगाव
मार्गे-मध्यवर्ती बस स्थानक

मार्ग क्रमांक- १०
औरंगपुरा ते छत्रपती शिवाजी नगर
मार्गे - महावीर चौक, ७ हिल

मार्ग क्रमांक- १२
सिडको ते घाणेगाव
मार्गे-रांजणगाव, मायलन कंपनी

मार्ग क्रमांक- १३
सिडको ते जोगेश्वरी
मार्गे - रांजणगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com