खामगावात ढगफुटीसदृश पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad rain news

खामगावात ढगफुटीसदृश पाऊस

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील खामगाव परिसरात रविवारी (ता.११) ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक दुकानांसह घरामध्ये पाणी शिरले. यामुळे पिकांचेही नुकसान झाल्याने बळिराजा हताश झाला होता.फुलंब्री तालक्यातील खामगाव येथे सतत ३ तास पडलेला पावसामुळे वडोद बाजारातून वाहणारी गिरिजा नदी दुथडी भरून वाहिली.

तालुक्यात सध्या सर्वप्रथम कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असतानाच रविवारी दुपारी सव्वा दोन वाजेनंतर या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सरासरी तीन तास चालू होता. यामुळे शेतामधून नदी स्वरूपातून पाणी वाहत असल्याने मका, कपाशी पिके आडवी पडली. यामुळे शेतकऱ्याची अतोनात नुकसान झाले आहे. खामगाव परिसरात दुपारनंतर जोरदार पडलेल्या पावसाने शेतात काम करणारे शेतकऱ्यांच्या काही मोटरसायकली बांधावर उभ्या होत्या. त्या पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडल्या आहे. तर अनेक जण शेतात सर्वत्र पाणी पसरल्याने अडकून पडले होते. अनेक ठिकाणी पाण्याला वाट मिळेल तिकडे रस्ता काढल्याने अनेक शेती क्षेत्रातून पाण्याचे पाठ निर्माण झाल्याचे चित्र होते.

फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार, पाथ्री , बोरगाव अर्ज या गावातून वाहणाऱ्या गिरिजा नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाल्याने गिरिजा नदी दुथडी भरून प्रथमच वाहिली. या नदीकाठी अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी असल्याने त्या पाण्यामध्ये भरल्याचे दिसून आल्या. या पावसामुळे फुलंब्री तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या सर्व नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तर खामगावसह अनेक गावात दुकानासह घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या संसार उपयोगी वस्तु या पावसात वाहून गेल्या. महसूल प्रशासनाने या भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Cloudy Rain Khamgaon Massive Loss Cropscloudy Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..