"महाराष्ट्रात इतक्या नद्या तरीही जनता पाण्यावाचून जगतेय" तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल : KCR in Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KCR

KCR in Maharashtra: "महाराष्ट्रात इतक्या नद्या तरीही जनता पाण्यावाचून" तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

संभाजी नगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत राष्ट्र समितीची सभा पार पडली, यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी राज्यातील नेत्यांवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरही केसीआर यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रात मुबलक नद्या आहेत पण तरीही जनता पाण्यावाचून जगतेय, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

केसीआर म्हणाले, महाराष्ट्रात इतक्या मोठ-मोठ्या नद्या आहेत जितक्या इतर राज्यांमध्येही नसतील इतक्या नद्या असणारं ताकदवान राज्य नागरिकांना पिण्याचं पाणी देऊ शकत नाही. या परिस्थितीतही आमचा इतका नाईलाज आहे का? जनता सोन्याची वीट, चंद्रतारे थोडेच मागत आहे केवळ पिण्याचं पाणीच तर मागत आहे.

राजकारण्यांच्या वारंवार घोषणानंतर आणि राजकीय गोंधल घातल्यानंतरही पिण्याचं पाणी आपल्याला मिळू शकत नाही, असा भारत पुढेही रहावा की बदलायला हवा. बेरोजगारी वाढतेय, लाखो उद्योग बंद होताहेत. देशात जातीयवाद, धार्मिक, लिंगभेद सुरु आहे. जो श्रीमंत आहे तो अधिकच श्रीमंत होतोय, जो गरीब आहे तो अधिकच गरीब होतोय, हे वास्तव आहे.

जर हे असंच चालू द्यायचं नसेल तर आपल्यालाच आपली ही समस्या दूर करावी लागेल यासाठी कोणी अमेरिकेतून येणार नाही, कोणी रशियातून येणार नाही, कोणी दुसऱ्या देशाचे लोक येऊन आपल्यासाठी काम करणार नाही, त्यामुळं जेवढे लकवर आपण जागृत होऊ ते चांगलं राहिल. जर तुम्हाला हे बदलायचं असेल तर भारतात परिवर्तन घडवायसाठीच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष निर्माण झाला आहे. भारतवासियांच्या हक्कांच्या लढाईसाठी बीआरएसची निर्मिती झाली आहे.

टॅग्स :Desh newsKCR