Congress Party Agitation In Aurangabad
Congress Party Agitation In Aurangabadesakal

ईडीच्या कारवाईमुळे काँग्रेसला आली जाग, केंद्र सरकारविरोधात आक्रमक आंदोलन

ईडीच्या कारवाईमुळे काँग्रेसला आली जाग

औरंगाबाद : केंद्र सरकारकडून ईडीचा वापर करून कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करण्यात आली. यामुळे कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी (ता.१७) औरंगाबाद (Aurangabad) येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शांततेत धरणे आंदोलन सुरू होते. मात्र या शांततेतील आंदोलनाला आक्रमक वळण लागले. युवक कॉंग्रेसचे (Yuvak Congress) कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको केला. रस्त्यात बसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अखेर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. (Congress Party Aggressive Against Modi Government In Aurangabad)

Congress Party Agitation In Aurangabad
औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, मुंबईत बैठक

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा (सक्तवसुली संचालनालय) गैरवापर करीत आहे. खासदार राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली नाहक मनस्ताप दिला जात असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करून याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेसचे (Congress Party) जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार सुभाष झांबड, माजी मंत्री अनिल पटेल यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात व ईडी कारवाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयामार्फत नोटीस दिली गेली होती.

Congress Party Agitation In Aurangabad
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा खोतांना टोला

जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांना ईडी कार्यालयात त्यांना बोलावून नाहक त्रास दिला जात आहे. तसेच गांधी कुटुंबीय व कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटीच्या दिल्ली येथील मुख्यालयात घूसुन पोलिसांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना अमानुषपणे मारहाण केली. याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात डॉ. काळे, हिशाम उस्मानी, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार सुभाष झांबड, एम. एम. शेख, नामदेवराव पवार, डॉ. जफर शेख , विलास औताडे, बाबुराव कवसकर, हेमलता पाटील, किरण पाटील डोणगावकर, अॅड. सय्यद अक्रम, इब्राहिम पटेल, निलेश अंबेवाडीकर, वरूण पाथ्रीकर, विलास औताडे, सरोज मसलगे , सुरेंद्र सोळुंके, अतिश पितळे, एम.ए.अजहर, अरूण शिरसाठ, रामराव शेळके, भाऊसाहेब जगताप, जयप्रकाश नारनवरे, संदीप बोरसे, धनंजय पाटील, इकबालसिंग गिल, निमेश पटेल, जितेंद्र मुगदिया, सुभाष देवकर, जगन्नाथ काळे, पुंडलिक जंगले, सीमा थोरात, अंजली वडजे, योगेश मसलगे आदी सहभागी झाले होते.

Congress Party Agitation In Aurangabad
एलाॅन मस्क यांच्याविरोधात २० हजार अब्ज रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा

पोलिस व्हॅन येताच घेतला काहींनी काढता पाय

सुरूवातीला शांतपणे घोषणा देत सुरू असलेल्या आंदोलनाला युवकांच्या आक्रमकपणामुळे वेगळे वळण लागले. कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. अचानक आंदोलनाने घेतलेल्या या वळणामुळे पोलिस यंत्रणा गडबडून गेली. सुरूवातीला एकच पोलिस व्हॅन होती. कार्यकर्त्या ताब्यात घेऊन गेल्यानंतर लगेच दुसरी आणि तिसरी आली. दुसरी व्हॅन भरून गेल्यानंतर तिसरीत कार्यकर्ते बसवण्यासाठी पोलिस सरसावले. मात्र काही नेत्यांनी आपापल्या वाहनातून तर कार्यकर्त्यांनी हळूच काढता पाय घेतला. यामुळे तिसरी पोलिस व्हॅन रिकामीच गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com