esakal | अत्यावश्यक खरेदी करताना पाळा सेफ डिस्टन्स

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत व त्याठिकाणी गर्दी केली जात आहे. आताच योग्य काळजी घेतली नाही तर तिसरा टप्पा सर्वांसाठी मोठा घातक ठरणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही खरेदीसाठी बाहेर पडला तरी सर्वत्र सेफ डिस्टन्स नियमाचे पालन करा असे आदेश सरकारने काढले आहेत.

अत्यावश्यक खरेदी करताना पाळा सेफ डिस्टन्स
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशे आवाहन केले जात आहे. मात्र अनेक जण औषधी खरेदी, भाजीपाला व किराणा दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे सेफ डिस्टन्स (सुरक्षित अंतर) या नियमाचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर दुकानदारांना सेफ डिस्टन्सचे पालन करण्याच्या सूचना नोटीसद्वारे दिल्या जाणार आहेत. 

कोरोना व्हायरसचा भारतातील तिसरा टप्पा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात पोचण्यापूर्वीच खबरदारीच्या सर्व उपाययोजना केंद्र व राज्य सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. असे असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणांचा समावेश असला तरी औरंगाबाद शहरात देखील काळजी घेतली जात आहे. अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत व त्याठिकाणी गर्दी केली जात आहे. आताच योग्य काळजी घेतली नाही तर तिसरा टप्पा सर्वांसाठी मोठा घातक ठरणार आहे. त्यामुळे जरी तुम्ही खरेदीसाठी बाहेर पडला तरी सर्वत्र सेफ डिस्टन्स नियमाचे पालन करा असे आदेश सरकारने काढले आहेत.

या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी महापालिका कृषी उत्पन्न बाजार समिती, जुना मोंढा, नवीन मोंढा यासह शहरातील गर्दीची ठिकाणे, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्रीची दुकाने, बँका, शासकीय वा खासगी कार्यालये या सर्वांनी ‘सेफ डिस्टन्स’ नियमाचे पालन करावे अशा सूचना महापालिकेतर्फे नोटीसद्वारे देणार आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. शुक्रवारी महापालिकेतर्फे अत्यावश्‍यक कामांच्या बैठका घेतल्या त्यावेळी देखील सेफ डिस्टन्स ठेऊनच अधिकारी बैठकीला बसले होते. अनेक भागात कचरा टाकताना देखील महिला सेफ डिस्टन्स ठेऊन कचरा गाडीत टाकत असल्याचे चित्र आहे. 
 
एक ते दीड मिटरचे अंतर सेफ डिस्टन्स? 
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने, त्यांच्या शिंकेतून किंवा खोकल्याव्दरे बाहेर पडणाऱ्या जंतूंपासून होतो. त्यामुळे प्रत्येकाने गर्दीच्या ठिकाणी वा कोठेही जमताना एकमेकांत एक ते दीड मीटरचे सुरक्षित अंतर ठेवायला हवे. दुकान, बाजारपेठांच्या ठिकाणी खरेदी करताना वा अन्य सार्वजनिक सुविधेच्या ठिकाणी व्यवहार करताना प्रत्येकाने असे सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे.