चांगली बातमी : औरंगाबादेत 58 वर्षीय महिला कोरोनमुक्त

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : कोरोनासंबंधी औरंगाबादकरासाठी एक चांगली बातमी आहे. शहरातील सिडको एन -4 भागातील ५८ वर्षीय महिला कोरोनमुक्त झाली आहे. या महिलेला बुधवारी (ता. 15) रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी 'सकाळ'ला दिली. यापूर्वी एक प्राध्यापिका कोरोनमुक्त झाली. डॉक्टरांची मेहनत फळाला आली असून, त्यामुळे इतर कोरोनाबाधित रुग्ण आणि शहरासाठी मोठे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

कोरोनाची बाधा झाल्याच्या संशयावरून जिल्हा रुग्णालय अर्थात मिनी घाटी येथे सिडको एन-चार येथील ५८ वर्षीय महिलेला भरती करण्यात आले होते. 15 दिवसांपूर्वी त्यांच्या लाळेच्या नमुन्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तेव्हापासून १४ दिवसांनंतर परत चाचणीसाठी स्वॅब नमुने घेण्यात आले. यात त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.

खात्रीसाठी चोवीस तासांच्या अंतराने त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत.  त्यामुळे त्यांना सुटी होणार आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

अशी होती ट्रॅव्हल हिस्ट्री

सिडको एन-चार येथील ५८ वर्षीय महिला कुलू-मनाली येथे पर्यटनासाठी पतीसमवेत गेली होती. ते दिल्ली येथून दोन मार्चला औरंगाबादेत पोचले. त्यानंतर १६ मार्चदरम्यान अंत्यविधीसाठी धुळे येथे व नंतर नाशिक येथे जाऊन दोघे औरंगाबादेत परतले होते. त्यानंतर त्यांच्या पतीला सौम्य लक्षणे दिसून आली. त्यांनी आधी खासगी व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले. महिलेला मात्र कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या लवकरच बऱ्या होऊन घरी जातील, असा डॉक्टरांना विश्वास आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या चाळीस वर्षीय वाहनचालकालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर चालकाच्या पस्तीस वर्षीय पत्नीलाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या दोघांवरही सध्या उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com