esakal | यंदाही सार्वजनिक ठिकाणी चार तर घरगुतीसाठी दोन फूट गणेशमूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती मुर्ती

यंदाही सार्वजनिक ठिकाणी चार तर घरगुतीसाठी दोन फूट गणेशमूर्ती

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद: केंद्रीय कृती गटाने कोरोना संसर्गाची तिसरी लाट येत्या काही दिवसात येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाही गणेशोत्सवात कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी चार फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी दोन फूट उंचीची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती शक्यतो वापरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. ‘ब्रेक द चेन’च्या लेवलनुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील.

काय करावे
० कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या शासनाने‍ विहित केलेल्‍या नियमांचे पालन करा.
० मंडळांनी स्‍थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन धोरणाशी सुसंगत मंडप उभारावेत.
० शक्‍यतो घरीच धातू किंवा संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे.
० मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्‍यास त्‍याचे विसर्जन शक्‍यतो घरीच करावे.
० आरोग्‍यविषयक व सामाजिक संदेश असलेल्‍या जाहिराती प्रदर्शित करण्याला प्राधान्य.
० सांस्‍कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम घ्यावेत.
० रक्‍तदान शिबिर, कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदींबाबत जनजागृती करावी.
० श्रीगणेशाच्‍या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट इत्‍यादीद्वारे करावी.
० गणपती मंडपामध्‍ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्‍क्रीनिंगची पुरेशी व्‍यवस्‍था करावी.
० मंडळाच्‍या ठिकाणी शारीरीक अंतराचे पालन, मास्‍क आणि सॅनिटायजरचा वापर करावा.
० घरगुती गणपतीचे घरातच किंवा स्‍थानिक प्रशासनाच्‍या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.
० प्रशासनासह स्‍वयंसेवी संस्‍था आदींच्या मदतीने विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव बनवावेत.

हेही वाचा: सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर अपघात, एक जण गंभीर जखमी

काय करू नये-
० घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्‍यात भपकेबाजी नसावी.
० सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी वर्गणीबाबत कुणालाही आग्रह धरु नये.
० आरती, भजन, किर्तन वा अन्‍य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी करु नये.
० सार्वजनिक गणेश मंडळांनी महाप्रसाद, भंडारा आदींचे आयोजन करु नये.
० श्रीगणेशाचे आगमन व विसर्जनप्रसंगी मिरवणुका काढू नये व ध्‍वनीप्रदूषण करु नये.
० चाळ, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्‍या विसर्जनाची मिरवणूक एकत्रीतरित्‍या नको.
० सुरक्षेच्यादृष्टीने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्‍थळी जावू नये.

loading image