औरंगाबाद शहरात दिवसभरात तब्बल १४ हजार जणांने लसीकरण

मागील काही दिवस शहरात लसींचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. पण १८ वर्षावरील लसीकरण सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे
covid 19
covid 19covid 19

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी (covid 19 vaccintaion aurangabad) बुधवारी (ता. २३) शहरातील तरुणांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे दिवसभरात तब्बल १४ हजार ६७ जणांना लस देण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

मागील काही दिवस शहरात लसींचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. पण १८ वर्षावरील लसीकरण सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. तिसरी लाट टाळायची असेल तर शहरातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाची यंत्रणाही मोठ्या प्रमाणात कष्ट घेत आहे. शहरातील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

covid 19
दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात

या आरोग्य केंद्रांवर आज लसीकरण

कोविशिल्ड (१८ वर्षे वयोगटापुढील): भीमनगर, आरेफ कॉलनी, गरमपाणी, हर्षनगर, जिन्सी रेंगटीपुरा, बायजीपुरा, गांधीनगर, नेहरू नगर, हर्सुल महापालिका केंद्रीय शाळा, आयएमए हॉल, जवाहर कॉलनी, पीर बाजार, चिकलठाणा, नारेगांव, जुना बाजार, नक्षत्रवाडी, सिल्कमिल कॉलनी, सिडको एन-८, सिडको एन-११, विजय नगर, सातारा, शहा बाजार, मातोश्री मीराताई रामराव शिंदे आरोग्य केंद्र (मसनतपूर), शिवाजी नगर, सादात नगर, कैसर कॉलनी, मुकूंदवाडी, गणेश कॉलनी, छावणी परिषद रुग्णालय, चेतना नगर, औरंगपुरा, ईएसआयसी हॉस्पिटल, देवळाई, भवानी नगर, बन्सीलाल नगर, श्री. संत विश्रामबाबा शाळा (नंदनवन कॉलनी), भिम नगर, फोस्टर कॉलेज, स्मिताज् मॅटर्निटी हॉस्पिटल, कसबेकर हॉस्पिटल, तेली समाज मंगल कार्यालय (भवानी नगर), छत्रपती हॉल (हर्सुल पीसादेवी रोड), बालाजी मंगल कार्यालय, ज्ञान साधना कोचिंग क्लासेस ( जवाहर कॉलनी), वरद बाल रुग्णालय, रेडक्रॉस सोसायटी (एमसीईडी ऑफिस समोर, रेल्वेस्टेशन), महापालिका शाळा (पीर बाजार), चिकलठाणा महापालिका शाळा, समाजमंदिर एन-२, अग्रसेन विद्या मंदिर (ईटखेडा),

ताठे मंगल कार्यालय सिडको एन-११, मयूरपार्क (दिशा सोसायटी जवळ), छत्रपती शाळा (बाळकृष्ण नगर), एमआयटी कॉलेज, गेट नं.८, उमंग हॉस्पिटल (शिवाजी नगर), गाडे हॉस्पिटल (पुंडलिक नगर), गरवारे कम्युनिटी हॉल एन-७, दुर्गाप्रसाद आरोग्य केंद्र (शहागंज), सुभश्री हॉस्पिटल (पुंडलिक नगर), धूत हॉस्पिटल, वंदेमातरम् शाळा (पुंडलिक नगर), महापालिका शाळा जिजामाता कॉलनी, सीएसएमएसएस कॉलेज (नक्षत्रवाडी), श्री. समर्थकृपा गृहनिर्माण संस्थेचे समाजमंदिर (श्रीनगर उल्कानगरी), संत रोहीदास आरोग्य केंद्र (मुकुंदवाडी), सोमानी डेंटल क्लिनिक, महेश नगर रोड, सेंट जॉन इंग्लिश स्कूल (जळगांव रोड), पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य केंद्र (पुंडलिक नगर), डिकेएमएम कॉलेज. ओम प्राथमिक शाळा एन-६, गुरुकुल शाळा (राजनगर), हनुमान मंदिर रामनगर, प्रेसियस पॉलिक्लिनक एन-३, महापालिका शाळा कैलासनगर, संजीवनी ग्लोबल विद्यालय होणाजीनगर. श्रीपाद हॉस्पिटल एन-८, पोलिस मुख्यालय.

covid 19
Corona Updates: मराठवाड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

कोवॅक्सीन (फक्त दुसरा डोस): क्रांती चौक आरोग्य केंद्र, राज नगर आरोग्य केंद्र, एमआयटी हॉस्पिटल, एन-४.

कोविशिल्ड (ड्राइव्ह इन व्हॅक्सिन): प्रोझोन मॉल पार्किंग.

विदेशात जाणारे विद्यार्थीः बन्सीलालनगर आरोग्य केंद्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com